भव्य पाककला स्पर्धेचे आयोजन

0

नाशिक,दि,५ मार्च २०२४ –जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दैनिक गांवकरी तर्फे यंदाही पाक कला कृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा रविवार दि. १० मार्च २०२४ रोजी दैनिक गांवकरी कार्यालय, टिळक पथ, रेडक्रॉस सिग्नल जवळ नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश फी नाही अशी माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली आहे.

या स्पर्धेसाठी स्पर्धकांना मिलेट ( कोणतेही कड धान्य) पासून बनवलेले नाश्त्याचे गोड किंवा तिखट पदार्थ बनवायचे असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना दिनांक ९ मार्च २०२४ दुपारी १२ पर्यंत आपली नाव नोंदणी खालील दिल्येल्या नंबरवर करायची आहे. स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय’ पारितोषिके असून प्रत्येकास सहभागी स्पर्धकांना आकर्षक गृहोपयोगी भेटवस्तू मिळणार आहे.

स्पर्धेचे नियम व अटी
१.सहभाग घेण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक
२.पदार्थ घरून बनवून आणायचा आहे.
३.कागदावर कृती लिहून आणणे
पदार्थाची चव, सजावट आणि मांडणीवर विजेत्यांची निवड करण्यात येईल.
.एका स्पर्धकांने एकच पदार्थ आणावा.
५.परिक्षकांचा निर्णय अंतिम असेल,
.स्पर्धेचे हक्क आयोजकांकडे राखीव आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काय करावे
खालीलपैकी एकाच मोबाईल क्रमांकावर ९ मार्च दुपारी १२ पर्यंत नाव नोंदणी करा, नोंदणी केली नसल्यास सहभागी होता येणार नाही,
नाव नोंदणी साठी संपर्क
9511857386
9673419823
9028518523

या स्पर्धेसाठी दीप अप्लायन्सेस, कॉलेजरोड,गजानन एंटरप्रायजेस, मांजरगाव {प्रोप्रा: गणपत हाडपे) यांचे विशेष सहकार्य लाभले असून वैद्य विक्रांत जाधव सुशिला आयुर्वेद चिकित्सालय,नाशिक यांचे सहकार्य आहे .जास्तीत जास्त लोकांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.