उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाशकात जल्लोषात स्वागत
नाशिकला पूर्णवेळ आयुक्त मिळण्याची राष्ट्रवादीची मागणी
नाशिक,दि.१५ जुलै २०२३ – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे आज नाशिक रोड रेल्वे स्थानकात आगमन होताच पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने ढोलताशा वाजवत, फटाक्यांची आतषबाजी व पुष्पवृष्टी करत नाशिक शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी खासदार देविदास पिंगळे, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर, नितीन पवार, आमदार सरोज आहिरे, माजी आमदार जयवंतराव जाधव, अपूर्व हिरे, जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नानासाहेब महाले, निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, कैलास मुदलीयार, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, समाधान जेजुरकर, महिला शहराध्यक्ष योगिता आहेर, विद्यार्थी अध्यक्ष गौरव गोवर्धने, मीनाक्षी काकळीज, सुरेखा निमसे, डॉ.कल्पना शिंदे, संजय खैरनार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आज शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी नाशिक दौऱ्यावर आहे. सकाळी ९ वाजेच्या वंदे भारत एक्सप्रेसने नाशिकरोड रेल्वे स्थानकात त्यांचे आगमन झाले. या प्रसंगी माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर नाशिकरोड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.
त्यानंतर नाशिकरोड येथून मोटारसायकल रॅली काढत नाशिक रोड ये शासकीय विश्रामगृहापर्यंत त्यांचे शहरात ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. या प्रसंगी माजी खासदार समीर भुजबळ यांनी त्यांच्या गाडीचेसारथ्य केले.
नाशिक शहरात त्यांचे नाशिक रोड,छत्रपती शिवाजी महाराज चौक, दत्त मंदिर, उपनगर, द्वारका, मुंबईनाका चौकासह ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करत फुलांची उधळण करत जल्लोषात स्वागत करण्यात आले. जेसीबी मधून पुष्पवृष्टी करत क्रेनच्या सहायाने हार घालण्यात आला. यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांची व नाशिककरांची अभूतपूर्व गर्दी बघावयास मिळाली.
माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्वागताची जय्यत तयारी :उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या गाडीचे खासदार समीर भुजबळ यांनी केले सारथ्य
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात शपथ घेतल्यानंतर शासन आपल्यादारी या उपक्रमाच्या निमित्ताने नाशिकला आले. त्यांच्या स्वागतासाठी केवळ एक दिवसात नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी अतिशय जय्यत तयारी केली. त्यांनी नाशिकरोड रेल्वे स्थानकात दाखल झाल्यानंतर भव्य रॅलीचे नियोजन केले. शहरात विविध ठिकाणी होर्डिंग्ज लाऊन शहरातील विविध चौकात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे जल्लोषात स्वागत केले.राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्वागताची समीर भुजबळ यांनी अतिशय नियोजनबद्ध तयारी केली.त्याचप्रमाणे अजितदादा पवार यांच्या गाडीचे सारथ्य केले.
नाशिकला पूर्णवेळ आयुक्त मिळण्याची राष्ट्रवादीची मागणी : माजी खासदार समीर भुजबळ व शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिले उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवेदन
नाशिक महापालिकेत गेल्या तीन महिन्यापासून पूर्णवेळ आयुक्त कारणाने सर्वसामान्य जनतेच्या हिताची कामे होत नसल्याने नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने पूर्णवेळ आयुक्त मिळावा अशा मागणीचे निवेदन माजी खासदार समीर भुजबळ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले.
नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांची प्रशासक पदी नेमणूक करण्यात आली. परंतु मे महिन्यात डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार हे प्रशिक्षणाकरिता गेल्यावर त्यांच्या जागी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. यानंतर दि. २ जून २०२३ रोजी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांची साखर आयुक्त, पुणे येथे बदली झाल्यावर राधाकृष्ण गमे व त्यानंतर जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्याकडे मनपा आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व जिल्हाधिकारी गंगाथरन डी.यांच्याकडील कामाचा व्याप बघता तसेच प्रशासकीय कारणास्तव नाशिक मनपा प्रशासक पदाचा अतिरिक्त कार्यभार मनपाच्या अतिरिक्त आयुक्त भाग्यश्री बानायत यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. यासंपूर्ण चक्रव्यूहात नाशिक मनपाला पूर्णवेळ आयुक्त न मिळण्याने अनेक महत्त्वाची कामे रखडली गेली आहेत.
अतिरिक्त आयुक्तांकडे कार्यभार असल्याने त्यांना धोरणात्मक निर्णय घेता येत नाही. प्रशासकीय राजवटीत स्थायी समिती, सर्वसाधारण सभेचे अधिकार आयुक्तांकडे असतात. दर महिन्याला या सभा होऊन विकास कामांचे प्रस्ताव मार्गी लावली जातात. परंतु पूर्णवेळ अधिकारी नसल्याने अनेक विषय प्रलंबित पडले आहेत. प्रशासनाला निविदा प्रक्रिया अंतिम करता येत नाही. नाशिक शहरात यंदा कमी पर्जन्यमान झाल्याने धरणातील उपलब्ध जलसाठ्याचे काटेकोरपणे नियोजनावरील घेण्यास सक्षम अधिकारी नाही. महापालिकेत जवळपास पाच हजार कंत्राटी कामगार कार्यरत असून इतर कामांकरिता पूर्णवेळ आयुक्त असणे आवश्यक आहे. पूर्णवेळ आयुक्तांची नेमणूक न झाल्यामुळे मनपाचा कारभार विस्कळीत झाला असून सर्वसामान्य नागरिकांची कामे रखडली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्याकरिता व नाशिक शहराचा विकासाला भर देण्याकरिता नाशिक महापालिकेत पूर्णवेळ आयुक्तांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी निवेदनात केली आहे