MET स्कूल ऑफ आर्किटेक्चर अँड इंटेरियर डिझाईन येथे डिप्लोमा इन आर्किटेक्चर कोर्स सुरू

1

नाशिक,दि.७ ऑगस्ट २०२३ – एम. ई.टी. भुजबळ नॉलेज सिटीच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चर अँड इंटेरियर डिझाईन या गोवर्धन गंगापूर नाशिक येथे असलेल्या इन्स्टिट्यूट मध्ये एम.एस. बी. टी. ई. संलग्नित व कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर मान्यता प्राप्त डिप्लोमा इन आर्किटेक्चर हा कोर्स सुरू झाला आहे. या कोर्सची २०२३ च्या ऍडमिशन संदर्भातील प्रक्रियाही सुरू झाली आहे या कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी इयत्ता दहावी उत्तीर्ण ही अर्हता असून हा डिप्लोमा कोर्स तीन वर्षाचा आहे.

एम.ई.टी. भुजबळ नॉलेज सिटी या संस्थेने नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लक्ष ठेवले आहे नाशिक शहर किंवा जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांच्या विकासासाठी ही एक अग्रणी व सर्व सुविधा संपन्न संस्था असून या मान्यताप्राप्त डिप्लोमा इन आर्किटेक्चर कोर्सचा विद्यार्थी व पालकांनी ॲडमिशन घेण्यासाठी निश्चितपणे फायदा करून घ्यावा असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. या कोर्सचा रजिस्ट्रेशन साठीचा चॉईस कोड ५४४५८०११० असा असून या संदर्भात ऍडमिशन घेण्यासाठी सर्व विद्यार्थी व पालक ७२६४०६५५५ या क्रमांकावर संपर्क करू शकता असं संस्थे तर्फे सांगण्यात आले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. […] आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण, ट्रेंडिंग कौशल्यं आणि जागतिक नोकरी संधी मिळवून देणे […]

Don`t copy text!