बाबाज थिएटर्सचा २३ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न
सोहळ्याच्या पुढील टप्प्यात ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान आगळ्यावेगळ्या मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन
नाशिक,दि.१८ सप्टेंबर २०२३ –नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रात आपले वेगळेस्थान निर्माण करणाऱ्या बाबाज थिएटर्सचा २३ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला.नाशिककर रसिकांनी या सोहळ्यास उत्तम प्रतिसाद दिला. १७ सप्टेंबर रोजी २३ व्या वर्धापन दिनानिमित्य विविध सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यक्रमाची मेजवानी नाशिकच्या सुजाण रसिकांना विनामूल्य देऊन रसिका विषयी कृतज्ञता भावना कलाकारांनी समर्पित केली.
दिनांक १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता प सा नाट्यगृह येथे सदाबहार नगमे हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सावाना चे संचालक श्रीकांत बेणी व राजाभाऊ पाटेकर यांनी सर्व कलाकारांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर राज ढगे, राजेश बागुल, दीपक चौधरी, सुनील आव्हाड, सागर उगले, स्मिता पांडे, शैला नेरकर, वृषाली गोळेसर व रिया बागुल यांनी अमोल पालेकर यांच्या वाद्यवृंद संयोजनाअंतर्गत आपली गायन कला सादर केली.
दिनांक १७ सप्टेंबर रोजी झी मराठी प्रस्तुत उत्सव नात्यांचा हा झी मराठीचा एक विशेष कार्यक्रम खास नाशिककरांसाठी सादर करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुंबईचे राजयोगी श्री मणीलाल छेडा तसेच प्रमुख पाहुणे नारायण गायकवाड यांनी बाबाज थिएटर्सच्या सर्व कार्याविषयी प्रशंसा केली. तसेच पुढील सर्व उपक्रमांसाठी मदत देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असू असे आश्वासन हि त्यांनी दिले.
सदर उत्सव नात्यांचा या कार्यक्रमात ३६ गुणी जोडी चे कलाकार आयुष संजीव म्हणजेच वेदांत वानखेडे व अभिनेत्री अनुष्का सरकटे म्हणजेच अमूल्या यांच्यासोबत प्रसिद्ध अभिनेता प्रणव रावराणे याच्या खुमासदार शैलीतून प्रेक्षकांनी या दोन्ही कलाकारांशी संवाद साधला व काही प्रेक्षकांनी प्रत्यक्ष प्रश्न विचारले तसेच एका प्रेक्षकाने चक्क या सिरीयलचे टायटल स्वतः गाऊन कलाकारांना आनंदित केले. या कार्यक्रमात मुंबईहून खास आलेल्या स्वप्निल गोडबोले व मुग्धा कऱ्हाडे या पार्श्वगायकांनी वेगवेगळ्या धाटणीची गाणी सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. कार्यक्रमाचे वाद्यवृंद संयोजन नाशिकच्या अमोल पालेकर यांचे होते. नाशिक मधील सुप्रसिद्ध नृत्यांगना सुमुखी अथणी हिच्या मार्गदर्शनातून तीन नृत्य कलाकारांनी आपली कला प्रस्तुत केली.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रशांत जुन्नरे, कैलास पाटील, प्रकाश साळवे, प्रकाश गोसावी, योगिता पाटील, दिलीप सिंह पाटील, श्वेता खिस्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर प्रीतीश कुलकर्णी यांनी केले.
पुढील सोहळ्याच्या टप्प्यात ३० सप्टेंबर रोजी लता मंगेशकर यांना श्रद्धांजलीपर नाशिकच्या १२ गायिका व सहा गायक सादरीकरण करणार आहेत.१ ऑक्टोबर रोजी राग रंग या कार्यक्रमाचा चौथा भाग सादर केला जाणार आहे. तसेच २ ऑक्टोबर रोजी दादा कोंडके यांच्यावरती प्रदर्शित झालेल्या गाण्यांचा एक आगळावेगळा कार्यक्रम सादर होणार आहे. आणि ३ ऑक्टोबर रोजी प्रेक्षक पत्रकार व कलाकार असा एक आगळावेगळा परिसंवाद होणार आहे.
सर्व रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार संस्थापक अध्यक्ष प्रशांत जुन्नरे व अमोल पालेकर यांनी मानले आहेत. तसेच पुढील सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून या आगळ्यावेगळ्या मनोरंजनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन बाबाज थिएटर्स तर्फे करण्यात आले आहे.
[…] एक ठोस आणि संवेदनशील भूमिका मांडणारा ‘वामा – लढाई सन्मानाची’ (Vama Ladhai Sanmanachi)हा स्त्रीप्रधान मराठी […]