नाशिक,दि. १२ ऑगस्ट २०२३ –नाशिकच्या सिडको परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेता किरण भालेराव यांच्या संकल्पनेतून भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. कलेच्या माध्यमातून दिग्गज कलावंतांच्या उपस्थितीत तिरंग्याला मानवंदना दिली जाते. यंदाच्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेता अभिजीत खांडकेकर यांच्या हस्ते (१५ ऑगस्ट) भारताच्या स्वतंत्र दिनी सकाळी ७ वाजता नाशिकच्या जुने सिडको येथील छत्रपती शिवाजी मार्केट परिसरात ध्वजारोहण होणार असून युवा आर्यमॅन रजनीश शैलेंद्र गायकवाड याची प्रमुख उपस्थिती असणार आहे
कै. शरद भालेराव यांच्या संकल्पनेतून गेल्या ३५ वर्षांपासून १५ ऑगस्ट भारताच्या स्वतंत्र दिनी आणि २६ जानेवारी प्रजसत्ताक दिनाच्या दिवशी या ठिकाणी ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. आपल्या वडिलांची परंपरा चालवत अभिनेता किरण भालेराव ही परंपरा जोपासत आहे,
या आधी अभिनेते डॉ. गिरीश ओक, चिन्मय उदगीरकर, मृणाल दुसानीस, हार्दिक जोशी,अतिशा नाईक, ऋषिकेश शेलार, पूजा पुरंदरे, नुपूर दैठणकर, विद्या करंजीकर, धनश्री क्षीरसागर,डॉ. रवींद्र कुमार सिंगल (IPS),डॉ. विनिता सिंगल (IAS) यांची या ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थति लाभली आहे.
हा सोहळा आयोजन करण्यासाठी शिवराज नाईक, आकाश तोटे, गिरीश वालझाडे, दीक्षांत पांडे, अमोल तासकर, पंडीत गीते, विशाल खैरनार, ज्ञानेश्वर गांगुर्डे, कुंदन महाले, भावेश बर्वे, सूरज अहिरे, मंगेश ठाकूर,कौस्तुभ जोशी हे प्रयन्त्नशील असून ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन अभिनेता किरण भालेराव यांनी केले आहे.