पवार तबला अकादमीतर्फे रविवारी २७ ऑगस्टला गुरुपौर्णिमा उत्सव
प्रसिद्ध छायाचित्रकार आणि पत्रकार अभय ओझरकर यांची प्रमुख उपस्थिती
नाशिक,दि. २४ ऑगस्ट २०२३ – नाशिकमधील गेल्या ५४ वर्षांपासून संगीत क्षेत्रात तबल्याचा प्रचार व प्रसार करणाऱ्या पवार तबला अकादमीचा गुरुपौर्णिमा उत्सव रविवार दि. २७ ऑगस्ट रोजी संध्या ४. ३० वा विशाखा सभागृह ,कुसुमाग्रज स्मारक येथे आयोजित केला आहे. प्रसिद्ध छायाचित्रकार आणि पत्रकार अभय ओझरकर या कार्यक्रमास प्रमुख अतिथी असतील.
या उत्सवात पवार तबला अकादमीचे सुमारे १०० विद्यार्थी तबला सहवादन सदर करतील. यात त्रिताल , झपताल , रूपक , मत्त , एकताल,पंचम सवारी या तालांमध्ये आपली कला सादर करतील. यानंतर प्रफुल्ल पवार (कॅजोन ), रोहित श्रीवंत (तबला ) आणि ओंकार कोडिलकर (पर्कशन ) अशा पाश्चात्य आणि भारतीय तालवाद्यांच्या फ्युजनचे सादरीकरण होईल. उत्तरार्धात अकादमीचे ज्येष्ठ शिष्य कुणाल काळे , अद्वय पवार आणि सुजीत काळे यांचे स्वतंत्र तबलावादन होणार आहे.त्यांना संवादिनी साथ संगत ज्ञानेश्वर कासार करतील. कार्यक्रमाची सांगता प्रसिद्ध सतारवादक प्रसाद रहाणे यांच्या वादनाने होईल. त्यांना तबलासाथ संगत अद्वय पवार करतील.
कार्यक्रमाचे निवेदन सायली गोखले ,छायाचित्रण महारुद्र आष्टुरकर ,पुष्कराज केतकर ,ध्वनी सचिन तिडके आणि ग्राफिक्स मिथिलेश मांडवगणे करतील हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून नाशिककर रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन पवार तबला अकादमीच्या वतीने करण्यात येत आहे.