ज्येष्ठ अक्षररचनाकार  सुनील धोपावकर यांच्या अक्षर प्रदर्शनाचे ९ मे रोजी उदघाटन 

0

नाशिक,दि,८ मे २०२४ – संस्कृती,नाशिक या संस्थेतर्फे येत्या ९ ते १२ मे २०२४ या दरम्यान नाशिकचे ज्येष्ठ अक्षर रचनाकार सुनील धोपावकर यांच्या अक्षर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.या प्रदर्शनाचे उदघाटन गुरुवार, ९ मे  २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजता ॲड. नितीन बाबुराव ठाकरे यांच्या शुभहस्ते कुसुमाग्रज स्मारक, विद्या-विकास सर्कल जवळ, गंगापूर रोड, नाशिक येथे होणार आहे.

प्रकाशन, मनोरंजन आणि जाहिरात क्षेत्रामध्ये ५० वर्षे कार्यरत असलेले अक्षररचनाकार म्हणून चित्रकार सुनील धोपावकर यांची ओळख आहे.महाराष्ट्रभरात त्यांची आजवर १० अक्षर प्रदर्शने झाली असून यंदाच्या प्रदर्शनामध्ये व्यक्तींच्या नावांच्या अक्षररचना प्रथमच कलारसिकांना पाहावयास मिळणार आहेत. नावाचे अर्थ सांगणारी अक्षरे हे या प्रदर्शनाचे वैशिष्टय असून या कलाप्रकारात जगातील हे पहिलेच प्रदर्शन ठरणार आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये भारतीय व्यक्तींची ३५,००० नावे धोपावकरांनी आपल्या शैलीत चितारली असून त्यापैकी २०० नावांच्या कलाकृती या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत.

सदर प्रदर्शन विनामूल्य असून नाशिककरांनी या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन संस्कृती नाशिकचे अध्यक्ष शाहू खैरे यांनी केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.