वाफाळलेल्या चहा सोबत उघडली आठवणींची शिदोरी

गुलाबी थंडी अन ‘आठवणीतला चहा’ : जनस्थान आणि  ११:३० @ सलीम व्हाट्सअप ग्रुप तर्फे ‘आठवणीतला चहा’ चे आयोजन 

0

नाशिक,२५ डिसेंबर २०२२ – कॉलेज जीवन म्हटले की अनेकांना आठवते ती सलीम मामूची चहाची टपरी. गेल्या काही वर्षांपासून ११:३० @ सलीम आणि जनस्थान या ग्रुपच्या सदस्यांनी कॉलेजरोडवरील सलीम चहाच्या टपरीवर एकत्र जमत आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आठवणीतला चहा हा कार्यक्रम सुरु केला आहे. कोरोनामुळे तब्बल ३ वर्षांनतर पुन्हा एकदा शनिवार (दि.२४) रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ यावेळेत कॉलेज रोडवरील सलीम टी टॉल येथे ‘आठवणीतला चहा’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

थंडीमुळे हुडहुडी भरलेली असताना कधी काळी टपरीवर चहा घेताना रंगणाऱ्या किश्‍श्‍यांची आठवण सांगताना उबदार वातावरण अनुभवायला मिळाले. यावेळी  विविध क्षेत्रांतील मान्यवर चहाचा आस्वाद घेत गप्पांबरोबर आपल्या काळातील कडू- गोड आठवणी यावेळी शेअर केल्या. मग त्या प्रेमाच्या गोष्टी असो अथवा राजकीय, अनेकांनी या सलीमच्या चहाच्या आस्वादाने आपली स्वप्ने रंगवली आणि त्यात यशस्वी झाले, काहीजण अजूनही वाटचाल करीत आहेत. सलीम मामुंची पुढची पिढी म्हणजे त्यांचे दोन्ही मुले लियाकत व जावेद पठाण हे आजही तितक्याच प्रेमाने व आपुलकीने येणाऱ्या प्रत्येकाला चहा पाजत आहे.

या कार्यक्रमात गप्पागोष्टी, गायन, वादन, बासरीवादन, अनुभव कथन आदींचा आस्वाद या ग्रुपच्या सदस्यांसह नाशिकमधील दिग्गजांनी याठिकाणी येत आनंद घेतला.नरेंद्र पुली, संकेत बरडिया व त्यांच्या विद्यार्थ्यांचे गिटार वादन, मोहन उपासनी मधुर गायन व सुरेल बासरीवादन, सतीश कोठेकर यांचे गायन, रवी शेट्टी, अविराज तायडे यांचे गायन, सुनील कोटगी यांनी हास्ययोगा करून आपली कला सादर केली.

Nashik News :Janasthan Group memories opened with steaming tea

यावेळी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींमध्ये खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार जयंत जाधव, लक्ष्मण सावजी, अजय बोरस्ते, सुरेश आणणा पाटील, किशोर पवार, नागरगोजे आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लिना बनसोड, अशोक कटारिया, अतुल चांडक, शैलेश कुटे, वैद्य विक्रांत जाधव, नंदकिशोर भुतडा, विश्वास ठाकूर, अविराज तायडे ,अभिनेता अभिषेक रहाळकर, नगरसेविका स्वातीताई भामरे, हिमगौरी आडके, उत्तरा खेर, शहर अभियंता वंजारी साहेब, आनंद ढाकीफळे ,विनोद राठोड, राजा पाटेकर, विनायक रानडे, ईश्वर जगताप, सी.एल. कुलकर्णी ,मुकुंद कुलकर्णी ,आशिष रानडे ,ज्ञानेश्वर कासार,माधुरी कुलकर्णी,रेखा केतकर ,शुभांगी पाठक ,शीतल सोनवणे, ,लक्ष्मी पिंपळे,राजेश जाधव ,प्रिया तुळजापूरकर,गणेश शिंदे, या मान्यवरांसह विविध खात्यातील अधिकारी, विविध मोठ्या संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कलावंत आणि आजी-माजी विद्यार्थी आवर्जून उपस्थित राहिले.आदी मान्यवर व अनेक नाशिककर चहाप्रेमी उपस्थित होते. सलीमची टपरी ही सर्वांना एकत्र बांधून ठेवणारे माध्यम असल्याचे सर्वांनी शिक्कामोर्तब केले.

जनस्थान ग्रुपचे प्रमुख अभय ओझरकर व ११:३० @ सलीम व्हॉट्सअॅप ग्रुपचे प्रसाद गर्भे तसेच रवी जन्नावार, नंदन दीक्षित यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले होते. तर कार्यक्रमाची संकल्पना आर. जे. भूषण मटकरी यांची होती. आठवणीतल्या चहासाठी रिदम साउंड, लाईट्स व इव्हेंट्स, गोदा श्रद्धा फाउंडेशन व द बलून.इन, हाईड आउट कॅफे व किशोर कांकरिया व कवी मराठे यांचे विशेष सहकार्य लाभले होते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.