नाशिक महानगर पालिकेत आजपासून पुष्पोत्सवाचे आयोजन
अभिनेत्री व गायिका केतकी माटेगावकर ची विशेष उपस्थिती
नाशिक,दि,९ फेब्रवारी २०२४ –नाशिक महानगरपालिके तर्फे आज दि.९ ते ११ फेब्रुवारी दरम्यान पुष्पोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटनाचा आज दुपारी ४ वाजता रोजी पालकमंत्री दादाजी भुसे, मंत्री, होणार असून त्यांचे हस्ते मानांकनाच्या ट्रॉफीज चे वितरण होईल. त्यानंतर पुढील दोन दिवस हे पुष्प प्रदर्शन नागरीकांना पहावयास मिळणार आहे.या उदघाटन समारंभास सिने अभिनेत्री व गायिका केतकी माटेगावकर यांची उपस्थित राहणार आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी सर्व नागरीकांना मोफत प्रवेश असून सर्व पुष्प प्रेमींना या प्रदर्शनाचा दि.९ ते ११ फेब्रुवारी पासून सकाळी ९ ते रात्री ९ पर्यत लाभ घेता येईल.
नाशिक महानगरपालिकेमार्फत सन १९९६ पासुन पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. विविध गटात स्पर्धकांमार्फत सुमारे १७९७ प्रवेशिका आल्या असून .नर्सरी व फुड स्टॉल देखिल पुष्पोत्सवात असुन सर्व ४२ नर्सरी स्टॉल व २० फुड स्टॉलचे बुकींग झाले आहेत.प्रवेशद्वारावर फुलांची आकर्षक कमान उभारण्यात येणार असून प्रांगणात सेल्फी पॉईंट उभारण्यात येणार आहे. प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण मिनीएचर लॅन्डस्केपींग, कार्यालयाच्या तीन ही मजल्यावर विविध गटाची मांडणी असणार असुन या विविध गटामध्ये गुलाबपुष्पे, मोसमी फुले, फळे, भाजीपाला, हार, बुके, पुष्परचना, बोन्साय, कॅक्टस, शोभिवंत कुंडया ठेवल्या जाणार आहेत.
पुष्पोत्सव मध्ये पुढिल प्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहे दि.९ फेब्रुवारी रोजी स्वरसंगीत, दि. १० फेब्रुवारी रोजी सकाळ सत्रात निसर्ग व फुलांवर आधारीत कवीता सत्र आणि सायंकाळी संगीत संध्या व दि 11 फेब्रुवारी रोजी संगीत रजनी. दि.11 फेब्रुवारी रोजी कार्यक्रमाची सांगता असुन त्या दिवशी विजेत्यांना ट्रॉफीज चे वितरण सिने अभिनेता किरण गायकवाड व सिने अभिनेत्री शिवानी बावकर यांच्या हस्ते होईल.
.पुष्प स्पर्धेव्यतिरिक्त नागरीकांकडुन निसर्गावर आधारीत पेंटीग, फुलांची माहिती देणारे छायाचित्र,तसेच श्री.खुशाल मच्छिंद्र जाधव व श्रीमती शीतल सिताराम थेटे (गोडसे) यांचेद्वारे शिल्पकला व काव्यात्मक रचनेच्या माध्यमातुन स्त्रीयांच्या आयुष्यातील सामाजिक व भावनिक विषय मांडणारी कलाकृती ठेवण्यात येणार आहे. याबरोबरच बसवंत गार्डन (मधमाशी उद्यान) यांचे मार्फत गा्रमीण संस्कृती व मधमाशी यांचे महत्व दर्शविणारा देखावा करण्यात येणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी दिली.पुष्पोत्सवास नागरिकांनी भेट देण्याचे आवाहन मनपा आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांनी केले असून 3 दिवस विविध कार्यक्रम आयोजित केले असल्याचे उद्यान अधिक्षक विवेक भदाणे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.