नाशिक ,दि,९ जानेवारी २०२४ –पाँडेचेरी येथील महायोगी अरविंद केंद्रातर्फे अमृतवक्ता स्वानंद बेदरकर यांची सलग पंधरा दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी ते नुकतेच पाँडेचेरी येथे रवाना झालेत.
दि १० जानेवारी ते २३ जानेवारी दरम्यान होणाऱ्या या व्याख्यानमालेत बेदरकर भारतीय संस्कृती, भारतीय संत साहित्याची फलश्रुती, महायोगी अरविंद या आणि अशा विविध तात्विक विषयांवर अभ्यासपूर्ण विवेचन करणार असून त्यासाठी त्यांच्यासमोर योगी अरविंद यांचा महाराष्ट्रातील साधक वर्ग श्रोता म्हणून असणार आहे.
भारतीय भाषांमधील विविध अभ्यासकांना पाँडेचेरी येथे अशा अभ्यास वर्गातील महनीय वक्ते म्हणून आमंत्रित केले जाते. त्यात यंदा बेदरकर यांना बोलण्याचा योग आला आहे. यापूर्वी प्राचार्य शिवाजीराव भोसले, प्राचार्य राम शेवाळकर,विवेक घळसासी, प्रकाश पाठक या आणि अशा अनेक वक्त्यांनी येथे व्याख्यान दिले असून यंदा बेदरकर वैविध्यपूर्ण व्यापक विषयावर मांडणी करणार आहेत.