बाबाज थिएटर्स तर्फे आज “लोकरंग महाराष्ट्राचे”या कार्यक्रमाचे आयोजन  

ज्येष्ठ हार्मोनियम वादक पं सुभाष दसक्कर,सुप्रसिद्ध सिने दिग्दर्शक,सुहास भोसले आणि संगीत संयोजक,गायक आदित्य पाटेकर यांचा कृतज्ञता पुरस्काराने होणार सन्मान

0

नाशिक ,दि, १ मार्च २०२४ –नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रात मह्त्वाचे योगदान देणाऱ्या  बाबाज थिएटर्स तर्फे आज  प्रशांत जुन्नरे यांच्या संकल्पनेतून “लोकरंग महाराष्ट्राचे ” हा नंदकुमार देशपांडे, सरगम अकादमी प्रस्तुत लोकसंगीतावर आधारित नव्या.जुन्या गाण्यांची सांगितिक मेजवानी नाशिककरांना अनुभवता येणार आहे. त्याच प्रमाणे याच कार्यक्रमात सांस्कृतिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करून नाशिक चे नाव जगाच्या नकाशावर नेणाऱ्या नाशिकचे ज्येष्ठ संगीतकार श्री. सुभाष दसक्कर,, सुप्रसिद्ध सिने दिग्दर्शक, रंगकर्मी श्री. सुहास भोसले आणि निवेदित तरुण कलाकार संगीत संयोजक, गायक आदित्य पाटेकर यांना नाशिकच्या एच.पी.टी.कॉलेजच्या माजी प्राचार्या प्रा.डॉ.वृंदा भार्गवे यांच्या शुभ हस्ते “कृतज्ञता पुरस्कार “प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे.आज सायंकाळी ६ वाजता कुर्तकोटी सभागृह,शंकराचार्य न्यास,गंगापूर रोड येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती बाबाज थिएटर्स चे प्रमुख प्रशांत जुन्नरे यांनी दिली.

गेल्या २३ वर्षांपासून बाबाज थिएटर्स ही आमची संस्था नाशिक व महाराष्ट्रात सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करीत आहे. कलाकारांना हक्काचे व्यासपीठ आणि सुजाण रसिकांना विनामूल्य मेजवानी ह्या हेतूने अनेक उपक्रम राबवित असते.  दर महिन्याच्या १ तारखेला कुर्तकोटी सभागृह, शंकराचार्य न्यास, गंगापूर रोड येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रतिथयश कलाकार आपली कला सादर करून सुजाण रसिकांना आनंद देतात. या विनामूल्य कार्यक्रमाचे आज  दिनांक १ मार्च रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत बाबाज थिएटर्स ४० वे पुष्प सादर करणार आहे.

प्रशांत जुन्नरे यांच्या संकल्पनेतून “लोकरंग महाराष्ट्राचे ” हा नंदकुमार देशपांडे, सरगम अकादमी प्रस्तुत लोकसंगीतावर आधारित नव्या. जुन्या गाण्यांची सांगितिक मेजवानी सरगम म्युझिक अकादमिचे  प्रतिथयश कलाकार अमित गुरव, प्रकाश रत्नाकर, अजय पाटील, संतोष कराळे, अपर्णा माडी वाले, मयुरी मुरडेश्वर, दर्शना बडोगे .वाद्यवृंद संयोजक अमोल पाळेकर यांच्या संयोजनातून सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन श्रीपाद कोतवाल करतील.कार्यक्रम विनामूल्य असणार आहे.

जास्तीत जास्त रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असं  आवाहन प्रशांत जुन्नरे, कैलास पाटील, प्रा. प्रितीश  कुलकर्णी, जे. पी. जाधव, शामराव केदार, दिलीपसिंह पाटील, डॉ. प्रमोद शिंदे, योगिता पाटील आणि एन. सि. देशपांडे यांनी केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.