“अनाहद” भारतीय व पाश्चात्य संगीताचा अनोखा संगम 

0

नाशिक,दि.१६ डिसेंबर २०२३ –भारतीय अभिजात संगीत स्वर, वाद्य, ताल यांनी इतके  व्याप्त आणि समृद्ध आहे की हे सुरुवात व शेवट यापलीकडे आहे आणि याच संकल्पनेला पकडून एका वर्षांपूर्वी आपल्या नाशिकचे गुणी तरूण कलाकारानीं सादर केला होता तोच कार्यक्रम नाशिककरांना पुन्हा अनुभवता येणार आहे ‘प्रोजेक्ट अनाहद’ ग्रुप तर्फे अनाहद ह्या कार्यक्रमाचे ,उद्या रविवार  दि.१७ डिसेंबर सायंकाळी ६.३० वाजता प.सा नाट्यगृह येथे आयोजन करण्यात आले आहे.

भारतीय अभिजात संगीत स्वर, वाद्य, ताल यांनी इतके  व्याप्त आणि समृद्ध आहे की हे सुरुवात व शेवट यापलीकडे आहे. आणि याच संकल्पनेला पकडून एका वर्षांपूर्वी आपल्या नाशिकचे गुणी तरूण कलाकार सितारवादक प्रतिक पंडित आणि तबलावादक अद्वय पवार यांनी भारतीय व पाश्चिमात्त्य वाद्यांना घेऊन अनाहद (अमर्याद) या सुंदर कलाकृतीची निर्मिती केली. यामध्ये त्यांनी शास्त्रीय संगीतातील पारंपरिक रागातील व तालांमधील भावपूर्ण स्वरकाम असणारी  तसेच रोमांचकारी हिशोब लयकार्य असणाऱ्या काही रचना स्वतः बांधल्या. त्यांना आपले नाशिकचे प्रतिभावंत कलाकार बासरीवादक समृद्ध कुटे आणि काहून वादक प्रफुल्ल पवार यांची समर्थ साथ लाभली. आणि नाशिकमध्ये ‘प्रोजेक्ट अनाहद’ यांचा पहिला कार्यक्रम झाला. जो प्रेक्षकांनी अतिशय उचलून धरला. मधल्या काळात या सर्व मंडळींनी मनापासून मेहनत करून अनेक कार्यक्रमात सादरीकरण केले आणि आज त्यांनी यशस्वीरित्या एक वर्ष पूर्ण केले आहे आणि ही त्यांचे पालक, गुरू व आपणा सर्वांसाठी खूप कौतुकाची आणि अभिमानाची बाब आहे.  त्यांच्याबरोबर सिन्थेसाईझरवर ईश्वरी दसककर ही नवीन सदस्या आली आहे.

संगीताकरिता वाहून घेतलेले हे सर्व उदयोन्मुख कलाकार  आहेत. गुरुंकडून मिळालेली कला जोपासून स्वतः त्यावर चिंतन मनन करून वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. शिकण्याची वृत्ती ही अनाहद आहे असं मानणारी व अतिशय नम्र व मुळांना धरून चालणारी गुणी पंचतत्वच जणू !

सर्वांसमोर जे इन्स्ट्रुमेंटल एनसेम्बल जे एकत्रित सादरीकरण होणार आहे त्याची पाळंमुळं भारतीय शास्त्रीय संगीतात प्राचीन काळापासून आहे. अशा प्रकारच्या फक्त वाद्यसमूहाला ‘कुतप’ असे म्हटले जात असे. कोणत्याही शब्दांशिवाय फक्त वाद्यांनी भावरसनिर्मिती करणे ही तितकीच कठीण चमत्कृती ही मुलं सहज करत आहेत.यामागे एकत्रितपणे असलेली त्यांची मेहनत, रियाझ एकता, विद्वत्ता तर दिसतेच पण त्याचबरोबर त्यांच्या मैत्रीत असलेली निखळता आणि त्यामुळे सादरीकरणाला आलेली उपजची मजा नक्कीच अनुभवता येईल.

या अश्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचा सर्वांनी आस्वाद घ्यावा,असे आवाहन अनाहद ग्रुप तर्फे करण्यात आले आहे.कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!