बाबाज थिएटर्स तर्फे आज ‘मराठी क्लासिक’ कार्यक्रमाचे आयोजन 

प्रा. आनंद अत्रे ,प्रा.वंदना रकिबे,प्रवीण कांबळे यांचा कृतज्ञता सन्मान पुरस्काराने होणार गौरव 

0

नाशिक,दि.१ डिसेंबर २०२३ – आज दिनांक १ डिसेंबर शुक्रवार रोजी बाबाज थिएटर्स प्रस्तुत मराठी क्लासिक्स हा भावगीत व सुगम संगीताचा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक व सुजाण रसिक प्रेमींसाठी कुर्तकोटी सभागृह, शंकराचार्य न्यास, गंगापूर रोड येथे सायंकाळी ५.४५ वाजता विनामूल्य आयोजित केला आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी दर महिन्याच्या एक तारखेला कार्यक्रमांचे आयोजन बाबाज सातत्याने करत आहे. एक डिसेंबरला ३७ वे पुष्प गुंफणार आहे. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांच्या मनातील अवीट गोडीची व सुमधुर मराठी गाणी सुप्रसिद्ध गायक अ‍ॅड. प्राजक्ता अत्रे, सुरभी गौड, संदीप थाटसिंगार, डॉ. सागर काकतकर व सुरज बारी सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन प्रज्ञा कुलकर्णी करणार असून संपूर्ण कार्यक्रमाचे वाद्यवृंद संयोजन अमोल पाळेकर करणार आहेत.

सुरुवातीला नेहमीप्रमाणे नाशिकच्या सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा कृतज्ञता सन्मान पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात येणार आहे.

या वेळेचे पुरस्कारार्थी
प्रा. आनंद अत्रे संगीतकार व गायकप्रा.
सौ. वंदना रकिबे सामाजिक व शैक्षणिक
श्री. प्रवीण कांबळे दिग्दर्शक व नाट्यकर्मी

सर्व सन्मानार्थींना ज्येष्ठ रंगकर्मी व लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष श्री.मुकुंद कुलकर्णी यांच्या शुभहस्ते गौरविण्यात येणार आहे.

तरी या विशेष कार्यक्रमाला सर्व रसिकांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन प्रशांत जुन्नरे, कैलास पाटील, प्रा. डॉ. प्रीतीश कुलकर्णी, एन सी देशपांडे, सौ. योगिता पाटील, शामराव केदार, जे पी जाधव, दिलीपसिंह पाटील आणि डॉ.प्रमोद शिंदे यांनी केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!