माधवबागचे मिलिंद सरदार सांगणार निरोगी आयुष्याची पंचसूत्री 

निरामय साधना यांच्या वतीने 'आनंदी जीवनाची गुरुकिल्ली' या कार्यक्रमाचे आयोजन

0

नाशिक,दि.५ डिसेंबर २०२३ -निरामय साधना यांच्या वतीने माधवबाग चे श्री मिलिंद सरदार यांचा’आनंदी जीवनाची गुरुकिल्ली’हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.यामध्ये जीवन शैलीचे आजार , त्यावरील उपचार आणि उपाय…  तसेच स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी काय करता येईल याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन मिळणार आहे.

‘निरामय साधना ‘ कृषीनगर जॉगिंग ट्रॅक गेल्या बारा वर्षांपासून नाशिककरांच्या पसंतीस उतरला आहे .कॉलेजरोड सारखा गजबजलेला परिसर असूनही तिथली हिरवाई,तिथला निसर्ग मनाला शांतता देते . ध्यानधारणेसाठी प्लॅटफॉर्म , ग्रीन जिम , योग-प्राणायाम साठी खास पॅगोडा, मोफत वर्तमानपत्र , अशा  सुविधांनी युक्त हा ट्रॅक अबालवृद्ध -सर्वांना च खुणावत असतो.

निरामय साधनाद्वारे नेहमीच आरोग्यविषयक व्याखाने, असे अनेक उपक्रम आयोजित केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून शनिवार दि. ९ डिसेंबर रोजी कुर्तकोटी शंकराचार्य न्यास संकुल, गंगापूर रोड येथे संध्याकाळी ५.३०वा.”आनंदी जीवनाची गुरुकिल्ली” हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये माधवबाग चे मोटीवेशनल हेल्थ स्पीकर ‘श्री मिलिंद सरदार’ प्रेक्षकांना  ‘जीवन शैलीचे आजार’ याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री. जे.पी.जाधव यांनी दिली

आपला आहार, विहार आणि विचार यामुळे आजकाल आपल्याला अनेक आजार जसे कि -मधुमेह,ब्लड प्रेशर ,ओबेसिटी,थायरॉईड आणि हृदयरोग होतात यांना जीवनशैलीचे आजार म्हटले जाते. म्हणूनच असे आजार बरे करण्यासाठी औषधे घेण्यापेक्षा जीवनशैलीत बदल केला तर ते उपयुक्त ठरते.श्री सरदार आपल्या व्याख्यानामध्ये  जीवनशैलीची पंचसूत्री सांगणार आहेत. ज्यामुळे हे आजार होत नाहीत आणि झाले  असले तरी हि पंचसूत्री त्यावर उपचाराचे काम करते. असे प्रतिपादन निरामय साधना चे कार्याध्यक्ष श्री  रवींद्र अमृतकर यांनी केले. याचवेळी माधवबाग च्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण क्रियेबद्दलहि  ते माहिती देणार आहेत. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात अनेकांना हे आजार होतात  अशावेळी ही क्रिया फायद्याची ठरते ज्यामुळे रुग्णाला संजीवनी  मिळते . कार्यक्रमात उपस्थितांना माधवबाग तर्फे तपासणी च्या विशेष ऑफर्स दिल्या जाणार आहेत..

सर्व नाशिककरांनी संपूर्ण कुटुंबासह आले तर व्याख्यानाचा निश्चित फायदा होईल.तरी सर्वांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन निरामय साधना संस्थेतर्फे सरचिटणीस श्री संजय ठाकरे यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निरामय साधना चे सर्व पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!