नाशिक,दि,१० डिसेंबर २०२४ – नर्तनरंग कथक नृत्य अकादमी आपल्या दशकपूर्ती निमित्त “दशक -निधान” हा कार्यक्रम आयोजित केले आहे. प्रेषिता पंडीत संचलित,नर्तनरंग कथक नृत्य अकादमी ही नाशिक मधील अतिशय उत्तम काम करणारी संस्था आहे. या संस्थेच्या दशकपूर्ती निमित्त नृत्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.अकादमीच्या सर्व शिष्या यात आपली नृत्य प्रस्तुती करीत आहेत. कार्यक्रमाचे गुरू स्थान ज्येष्ठ गुरू विद्या देशपांडे तर प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार भूषवणार आहेत. विवेक गरुड लिखित व सुनील देशपांडे दिग्दर्शित नृत्य- नाटिका “एक झाड- जे नेहमी नाहीच म्हणायचे ” आणि पंडीत जसराज यांच्या स्वर्गीय स्वराने व संगीताने सजलेली रचना “दशावतार ” अकादमीच्या वतीने प्रस्तुत करण्यात येणार आहे.
येत्या शुक्रवारी,१३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम कालिदास कलामंदिरात संपन्न होणार आहे तसेच प्रवेश सर्व रसिकांसाठी विनामूल्य आहे.जास्तीत जास्त संख्येने प्रेक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थे मार्फत करण्यात आले आहे.