Nashik : सिडको परिसरातील घरात स्फोट : ३ जण जखमी : स्फोटाचे गूढ कायम

0

नाशिक,दि. २७ सप्टेंबर २०२३ –नाशिकच्या सिडको परिसरातील उत्तमनगर येथे सकाळी ६ च्या सुमारास एका घरात स्फोट होऊन कुटुंबातील तीन जण जखमी झाले आहेत. त्यात एकाची तब्येत गंभीर असून जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोबाईलचा स्फोट झाला असावा असे सांगण्यात आले असले तरी हा स्फोट नेमका कशाचा झाला याचे गूढ मात्र कायम आहे. या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.

स्फोटामुळे मोठी घरातील पडद्यांनी पेट घेतला आणि गादीने हि पेट घेतला त्यामुळे आग भडकून घराचे नुकसान झाले. घरातील काही साहित्य जळून खाक झाले. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, यामुळे घराबाहेरील गाड्यांच्या काचा फुटल्या, आजूबाजूच्या घरांच्या काचा फुटल्या. त्यामुळे परिसरात काहीशी घबराट देखील पसरली.

या घटनेतील तुषार जगताप,शोभा जगताप,बाळकृष्ण सुतार असे जखमी झालेल्यांची नावे आहेत.अंबड पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून स्फोट नेमका का आणि कसा झाला याचा अधिक तपास सुरु आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.