नाशिक,दि.१ सप्टेंबर २०२३ –मंगळागौरीचे खेळ लुप्त होत असताना,अधिकाधिक लोकांपर्यंत ते सहज पोहोंचवता यावेत ह्या उद्देशाने”आकृती गृप” गेली चोवीस वर्षे सातत्याने मंगळागौरीचे खेळ सादर करीत आलेला आहे .आज (१ सप्टेंबर)सायंकाळी ६.०० वाजता परशुराम सायखेडकर नाट्यगृह येथे खेळ तुझा नी माझा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रम सर्वांसाठी खुला ठेवण्यात आला आहे.कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सुप्रिटेंड ऑफ पोलीस शर्मिष्ठा वालावलकर,आणि सुप्रिटेंड ऑफ जीएसटी च्या सुलक्षणा धुमाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. अशी माहिती अनघा धोडपकर यांनी दिली आहे.
स्त्रियांसाठी अतिशय उत्साहवर्धक वातावरण येथे अनुभवयास मिळते. खेळ असे खेळले जातात की ज्यामुळे सर्वांगाचा हसताखेळता व्यायाम शक्य होतो.आपण आपलं आयुष्य जगताना एका मनुष्याचा संबंध दुसऱ्या मनुष्याची येत असतो आणि या माणसाच्या सहवासातून त्याचे व्यक्तिमत्व त्याची वर्तवणूक याची कल्पना आपल्याला येत राहते. आपल्या सोबतच्या असलेल्या माणसांच्या अंतकरणातील माणुसकीचे दर्शन घडण्यासाठीच खरे तर हे मंगळागौरीचे खेळ. माणसा-माणसातील आपापसातील संबंध दृढ अतूट आणि अखंड अक्षय राहण्यासाठी , माणुसकीचा दिवा प्रकाशमय होण्यासाठी ही धडपड.
ह्या कार्यक्रमासाठी महिलांनी जे कष्ट घेतले आहेत त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने आपण ही ह्या कार्यक्रमास हजेरी लाऊन सर्व सहभागी महिलांचा उत्साह वृद्धिंगत करावा असे आवाहन अनघा धोडपकर, हरीश भाई ठक्कर,प्रकाश गोसावी यांनी केले आहे.