Nashik : बाबाज थिएटर्स तर्फे आज रागरंग कार्यक्रमाचे आयोजन
डॉ.सौ. नीलिमा बोकील,अभिनेता धनंजय वाबळे ,प्रथमेश जाधव यांना “कृतज्ञता सन्मान पुरस्कार”
नाशिक,दि.१ सप्टेंबर २०२३ –गत २२ वर्षांपासून बाबाज थिअटर्सची नाशिकमधील सांस्कृतिक चळवळीतील एक परिपूर्ण संस्था आपल्या सहकार्याने गेली २२ वर्षे विविध कार्यक्रमांच्या साक्षीने रसिकांचे मनोरंजन महाराष्ट्रभर करत आहे. तसेच विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन यशस्वीरीत्या आम्ही करत आहोत.
बाबाज थिअटर्सतर्फे जेष्ठ नागरिक व संगीतप्रेमींना अनोखी मेजवानी देण्यासाठी रागदारीवर आधारित हिन्दी-मराठी भाषेत अजरामर झालेल्या गाण्यांचा कार्यक्रम “रागरंग (पार्ट– ३)” या कार्यक्रमाचे आयोजन आज शुक्रवार दिनांक १ सप्टेंबेर २०२३ रोजी सायंकाळी ६:०० वाजता कुर्तकोटी सभाग्रह,शंकराचार्य न्यास, जुना गंगापुर नाका, नाशिक येथे करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रम विनामूल्य असून सदर कार्यक्रमामध्ये पुष्कराज भागवत, संदीप थाटसिंगार, प्रसाद गोखले, आरती पिंपळकर, रसिका नातू ही प्रतिथयश कलावंत आपली गायनातील कला सादर करणार असून वादकवृंद संयोजक अमोल पाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जयेश भालेराव, जितेंद्र सोनवणे, सुशील केदारे हे वादक असणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन स्नेहा रत्नपारखी ह्या करणार असून कौशल्य हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे डॉ. प्रमोद शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. सदर कार्यक्रमाची संकल्पना प्रशांत जुन्नरे यांची असून सदर कार्यक्रमाचे आयोजन कैलास पाटील, प्रा.डॉ. प्रितिश कुलकर्णी, एन.सी. देशपांडे, सौ. योगिता पाटील, श्यामराव केदार, जे.पी. जाधव, दिलीपसिंग पाटील यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रम दारम्यान सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल डॉ.सौ. नीलिमा बोकील उपप्राचार्य, एस.एम.आर.के.(सांस्कृतिक); श्री. धनंजय वाबळे (सिने अभिनेता) व प्रथमेश जाधव (नाट्यरंगकर्मी) यांना डॉ.सौ. दीप्ती देशपांडे, सेक्रेटरी, गोखले एजुकेशन सोसायटी यांच्यातफे “कृतज्ञता सन्मान पुरस्कार” देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी सादर कार्यक्रमाचा सर्व जेष्ठ नागरिक व नाशिकमधील संगीतप्रेमी रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बाबाज थिअटर्सचे प्रशांत जुन्नरे, कैलास पाटील, प्रा.डॉ. प्रितिश कुलकर्णी, एन.सी. देशपांडे, सौ. योगिता पाटील, श्यामराव केदार, जे.पी. जाधव, दिलीपसिंग पाटील यांनी केले आहे.