नाशिक,दि, ११ फेब्रुवारी २०२४ –नाशिक रोड देवळाली व्यापारी बँके(Nashik Road Deolali Vyapari Bank) तर्फे नुकतेच बिझनेस ग्रोथ ऑफ ब्रांच चे सत्र आयोजित करण्यात आले होते यावेळी सर्व शाखा मिळून ज्या शाखेची कामगिरी उत्तम आहे अशा शाखांच्या सत्कार करण्यात आला यावेळी इंगळे नगर शाखा ही सर्वच क्षेत्रात आघाडीवर राहिली. यावेळी इंगळे नगर शाखेचा सत्कार करण्यात आला.
इंगळे नगर शाखेचे अनिल गाडगीळ व उज्वला बागुल ह्यांचा बँकेचे अध्यक्ष श्री दत्ताजी गायकवाड ह्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक निवृत्ती अरींगळे, राम गायकवाड, डॉ. प्रशांत भुतडा, मनोहर कोरडे, जगन्नाथ आगळे, सुधाकर जाधव, रामदास सदाफुले, योगेश नागरे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सोनार,उपमुख्य कार्यकारी अधिकारी एकनाथ कदम आदी उपस्थित होते.