नाशिक २४ ऑगस्ट (प्रतिनिधी) : रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओला नुकताच ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डस् हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. रेडिओ विश्वासने अनेक कलावंतांना त्यांची कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. त्याचबरोबर विविध सामाजिक प्रश्न मांडण्यासाठी सर्वसामान्यांचा आवाज म्हणून रेडिओ विश्वास बांधिलकीच्या नात्याने काम करत आहे. रेडिओ विश्वास 3 लाख 18 हजार २५५ तास एका वर्षात ऐकला गेला आहे. असून भारताबरोबर सुमारे २१ देशांतील ५ लाख श्रोत्यांनी कार्यक्रम ऐकला आहे.
समुदाय विकास व त्याद्वारे सामाजिक विकास हे ध्येय ठेवून रेडिओ विश्वास कार्यरत आहे. सामान्य जनतेचे प्रश्न, लोककलावंतांना व्यासपीठ, प्रामुख्याने तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. आहे.रेडिओ विश्वास तर्फे विविध कार्यक्रम सादर केले जातात त्यात
आरंभ सुरवातीचे क्षण – युनिसेफ सोबत चालणारा प्रकल्प
स्वास्थ्य संकल्प – युनिसेफ सोबत चालणारा प्रकल्प
दासबोध,
अर्थविश्व,
आनंदघन ,
या सुखांनो या,
बाळू ऑन एअर,
मिशन ऑलम्पिक,
दिल ने पुकारा,
तनिषकांच्या भावविश्वात,
माझी कविता,
मला आवडलेले पुस्तक ,
शोध विज्ञानाचा,
मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग च्या मार्फत भारतातील दोनशेहुन अधिक कम्युनिटी रेडीओ साठी कपॅसिटी बिल्डींग वेबिनार घेण्यात आले. आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. विविध समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहे. जनसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून रेडिओ विश्वासने स्थान प्राप्त केले आहे.
रेडिओ विश्वासचे मार्गदर्शक विश्वास ठाकूर यांच्या विविध आधुनिक संकल्पना यांचा समावेश आणि दर्जेदार कार्यक्रम यांचा अनोखा मिलाफ कार्यक्रमांमध्ये असतो. स्टेशन डायरेक्टर डॉ. हरी कुलकर्णी, रूचिता ठाकूर व रेडिओ विश्वासची टीम आदींनी विशेष परिश्रम घेतले.