नाशिक, दि २ सप्टेंबर २०२३ – विदर्भातील अकोला येथील चित्रकर्ती प्रिया इंगळे यांच्या’ रंगप्रिया ‘ या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकरोड येथील पु. ना. गाडगीळ अँड सन्स शोरूममधील कलादालनात होणाऱ्या या प्रदर्शनाचे उदघाट्न उद्या रविवारी ( दि.३ ) सकाळी १० वाजता चित्रकर्ती व एमईटी – भुजबळ नॉलेज सिटीच्या मुख्य प्रबंधक डॉ. शेफाली भुजबळ तसेच आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार प्रफुल्ल सावंत यांच्या हस्ते होणार आहे
विशेष अतिथी म्हणून साहित्यिक संतोष हुदलीकर, भू- विकासक विनोद घाडगे उपस्थित रहाणार आहेत. नाशिकरोडला शिखरेवाडी समोर, पासपोर्ट ऑफिस शेजारी स्टारझोन मॉलमध्ये हे पीएनजी कलादालन आहे. या प्रदर्शनात ६० पेक्षा अधिक चित्रकृती रसिकांना बघायला मिळतील. सर्वांसाठी सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत प्रदर्शन खुले राहील. या विनामूल्य चित्रप्रदर्शनाला दि.१४ सप्टेंबरपर्यंत नाशिककर रसिकांनी भेट द्यावी. असे आवाहन संयोजकांनी केले आहे.