कलानंद तर्फे ३० ऑगस्टला गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन

0

नाशिक,दि,२८ ऑगस्ट २०२४ –शास्त्रीय नृत्य क्षेत्रातील अग्रगण्य कलानंद कथक नृत्य संस्था आपल्या ४५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘कथा रुप कथक’ या अभिनव संकल्पनेवर आधारित नृत्यात कलानंदच्या नवोदिन तसेच पारंगत विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे.कथक नृत्यामध्ये कथा कथनाला विशेष महत्व दिलेले आहे. कथक या नावातच कथा कथन आहे. या गोष्टी अधोरेखित करण्यासाठी यावर्षी कलानंदच्या नृत्यांगना ‘कथा रूप कथक’ सादर करणार आहेत.

कार्यक्रमाचे दिग्दर्शन सौ. संजीवनी कुलकर्णी आणि डॉ. सुमुखी अथणी यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी नाशिकमधील प्रतिथयश कलाकार श्री.नितीन पवार, श्री.व्यंकटेश तांबे- तबला; श्री.पुष्कराज भागवत- संवादिनी व गायन; श्री.अथर्व ठाकुर- गायन, रागेश्री धुमाळ- सिंथेसायझर हे साथ देणार आहेत.

कार्यक्रम शुक्रवार दि.३० ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता कालिदास कलामंदिर येथे संपन्न होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असुन,नाशिककर रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.