नाशिक,दि,२८ ऑगस्ट २०२४ –तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे श्यामरंग संगीत समारंभाचे आयोजन ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे करण्यात आले आहे . एकूण तीन सत्रांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.विख्यात गायक संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्मृतीनिमित्त होणाऱ्या शामरंग संगीत समारोहाचे हे २३ वे वर्ष आहे.
यावर्षी शनिवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या पहिल्या सत्रात समीर दुबळे (गायन) सुधीर नायक (हार्मोनियम सोलो) विनोद डिग्रजकर (गायन) हे कलावंत सहभागी होतील तर रविवारी सकाळी १०वा. होणाऱ्या दुसऱ्या सत्रात विजय कोपरकर आणि सुधाकर देवळे यांचे गायन होईल.
तर रविवारी सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या तिसऱ्या सत्रात हेमंत पेंडसे ,सुखदा दीक्षित यांचे गायन होईल तर शौनक अभिषेकी यांच्या गायनाने समारोहाची सांगता होईल. यावेळी कलाकारांना नितीन वारे, नितीन पवार, कल्याण पांडे, अद्वय पवार हे तबला संगत करणार असून शुभांगी भावसार ,सुभाष दसककर ,ईश्वरी दसककर हे कलावंत संवादिनीची साथ करतील. कुसुमाग्रज स्मारकात रंगणाऱ्या या अभिजात संगीताच्या सोहळ्यास रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे.