नाशिक,दि.२६ नोव्हेंबर २०२३- वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर डिजिटल पोट्रेट आर्टिस्ट प्रणव सातभाई याचे गुरुदक्षिणा,आर्ट गॅलरी बीवायके कॉलेज, कॉलेज रोड येथे तीन दिवसीय डिजिटल पोट्रेट प्रदर्शनाला आज पासून सुरुवात झाली आहे.
मिसेस ग्लोबल युनायटेड डॉक्टर नमिता कोहक, नाशिक फोटोग्राफी असोसिएशन चे अध्यक्ष संजय जगताप यांच्या हस्ते आज सकाळी 11 वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच फोटोग्राफी असोसिएशनचे सदस्य इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रेटी मान्यवरांचे, कलाकार मंडळी, राजकीय नेत्यांचे, समाजसेवकांचे त्याचबरोबर नेचर रिलेटेड वैविध्यपूर्ण पोट्रेट आपल्याला या प्रदर्शनात बघायला मिळणार आहेत.
काल पासून २६,२७ नोव्हेंबर पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. तरी या प्रदर्शनाला आपण जास्तीत जास्त संख्येने भेट द्यावी अशी विनंती आयोजकांतर्फे करण्यात आली आहे.