जाणोनी अर्थाची गुपितेचे २९ ऑगस्टला प्रकाशन:डॉ.धनश्री लेले यांचे विचार ऐकण्याची संधी

0

नाशिक ,दि,२७ ऑगस्ट २०२४ –‘शब्दमल्हार’प्रकाशनातर्फे शेगवीचे संत श्री गजानन महाराज यांच्यावरील ‘जाणोनी अर्थाची गुपिते’ या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवार दिनांक २९ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी सहा वाजता गंगापूर रोडवरील शंकराचार्य न्यास येथील कुर्तकोटी डॉ. शंकराचार्य सभागृहात होणार आहे. ख्यातनाम वक्त्या डॉ. धनश्री लेले यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार असून अमृतवक्ते स्वानंद बेदरकर यांची प्रकाशन समारंभास प्रमुख उपस्थिती असणार आहे.

शेगावीचे संत श्री गजानन महाराज यांच्या जीवनात घडलेल्या अनेकविध लीला, कथा ‘गजाननविजय’ या चरित्रग्रंथात दासगणू महाराजांनी ओवीबद्ध केल्या आहेत. त्यातील लीलांचा आजच्या संदर्भात अभ्यास करून त्याचे स्वतंत्र कथालेखन सुजाता नागपुरे यांनी केले आहे.

कोणत्याही संतांचा विचार हा तात्कालिक नसतो,तर तो दीर्घकालीन परिणाम करणारा असल्याने प्रत्येक पिढीत त्याचा नवा जीवनव्यापी अर्थ काढण्याचे काम झाले पाहिजे ही हे पुस्तक लिहिण्यामागची लेखिका नागपुरे यांची भावना होती.’शब्दमल्हार’प्रकाशनाने त्याला पुस्तक रूप दिले असून हे पुस्तक म्हणजे संत साहित्यावरचा हा एक नवा प्रयोग आहे; अशा श्रवणानंदाची अनुभूती देणाऱ्या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सुजाता नागपुरे आणि ‘शब्दमल्हार’ प्रकाशनाने केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!