जहागीरदार, बेदरकर, केळकर यांचे सावानाचे सभासदत्व कायम

श्रीकांत बेणी, मधुकर झेंडे, डॉ.वेदश्री थिगळे, वसंत खैरनार, हेमंत देवरे यांचे सभासदत्व रद्द

0

नाशिक,दि,२१ सप्टेंबर २०२३ – सार्वजनिक वाचनालय नाशिक या संस्थेत गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्याचा एक भाग संपुष्टात आला असून मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सावानाने कार्यकारी मंडळाच्या बैठकीत मान्य केला आहे. न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे मिलिंद जहागीरदार, स्वानंद बेदरकर आणि विनया केळकर यांचे सभासदत्व त्यांना प्राप्त झाले असून याच निर्णयानुसार श्रीकांत बेणी, मधुकर झेंडे, डॉ.वेदश्री थिगळे, वसंत खैरनार, हेमंत देवरे यांचे सभासदत्व रद्द झाले आहे.अशी माहिती सावानाचे प्रमुख सचिव धर्माजी बोडके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

सावानाचे माजी अध्यक्ष विलास औरंगाबादकर आणि त्यांच्या तत्कालीन कार्यकारी मंडळाने अनधिकाराने, घटनेची पायमल्ली करीत जहागीरदार, बेदरकर, केळकर यांचे सभासदत्व रद्द केले होते. त्या विरोधात संबंधित तिघेही धर्मादाय आयुक्त, दिवाणी न्यायालय येथे दाद मागण्यासाठी गेले होते. त्यापैकी धर्मादाय आयुक्तांचा निकाल पूर्णपणे जहागीरदार, बेदरकर, केळकर यांच्या बाजूने लागल्यानंतर तो न मानता वाचनालय वरच्या कोर्टात गेले. त्या विरोधात जहागीरदार, बेदरकर, केळकर हे तिघेही उच्च न्यायालयात गेले होते.उच्च न्यायालयाने धर्मादाय आयुक्त यांचा निकाल जैसे थे ठेवला.त्यामुळे तो निर्णय शिरसावंद्य मानत अध्यक्ष दिलीप फडके आणि कार्यकारी मंडळाने कार्यकारी मंडळाची बैठक बोलावत जहागीरदार,बेदरकर,केळकर यांचे सभासदत्व मान्य केले.

या निर्णयामुळे पूर्वी ज्यांचे सभासदत्व रद्द करण्यात आले होते,पण माजी अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांनी बेकायदेशीरपणे त्यांना सभासदत्व बहाल केले होते.ते या निर्णयामुळे पुन्हा रद्द झाले आहे. आपोआपच बेणी यांचे कार्यकारी मंडळ सभासदत्वही रद्द झाले आहे.

Savana Nashik News

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.