ठाकरे गटाच्या महानगरप्रमुखाचा मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सोबतचा व्हिडिओ व्हायरल

आमदार नितेश राणे यांनी आज विधानसभेत केला मोठा गौप्यस्फोट

0

नाशिक,दि. १५ डिसेंबर २०२३ –आमदार नितेश राणे यांनी आज विधानसभेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुंबई बॉम्बस्फोटात शिक्षा झालेल्या सलीम शेख सोबत उबाठाचे सुधाकर बडगुजर नाचत असल्याचा व्हिडीओ आहे. हा व्हिडिओ आज आमदार नितेश राणे यांनी दाखवल्या मुळे एकच खळबळ उडाली आहे.या व्हिडिओ बाबत
चौकशी झालीच पाहिजे. बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांशी बंधुत्व, हेच आहे का हिंदुत्व ? असा सवाल शिवसेना महानगर प्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी केला आहे.

१२ मार्च १९९३ ला मुंबईत १२ ब्लास्ट झाले होते. संपुर्ण देशाला हादरुन देणारा हा दिवस होता. देशातील हा सर्वात मोठा बॉम्बस्फोट म्हणावा लागेल. या हल्लात २५७ जणांचा मृत्यू झाला होता तर ७०० पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. या हल्ल्याच्या कटू आठवणी आजही अंगावर काटा आणतात. या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिमचा खास शूटर सलीम शेख उर्फ सलीम कुत्ता याला ही कटात सहभागी असल्याने न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली आहे. या सलीम शेख सोबत उबाठा गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर हे ‘मैं हूं डॉन’ या गाण्यावर डान्स करतांनाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

मुंबईत १२ ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून दहशत माजविणाऱ्या देशद्रोह्याचे पुष्पगुच्छ आणि भेट वस्तू देतांनाचे फोटोही व्हायरल झाले आहेत. हा अतिशय धक्कादायक प्रकार आहे. बडगुजर यांची तातडीने चौकशी व्हावी, त्यांनी काय भेट दिले? नाशिक मध्ये काही मोठे घडवायचे नियोजन आहे का? याची चौकशी झालीच पाहिजे. २५७ निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्यांचे, शिवसेना भवन उडविण्याचा कट रचणाऱ्याचे स्वागत सुधाकर बडगुजर का करत होते? त्याच्या सोबत नाचतात. हेच यांचे बेगडी हिंदुत्व आहे का? बडगुजर यांना नाशिकचे डॉन व्हायचे आहे का? ही पार्टी कुठे झाली? नाशिककरांना या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळालीच पाहिजे, अशी मागणी शिवसेना महानगर प्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी केली आहे.

आमदार नितेश राणे व्हिडिओ व्हायरल केल्या नंतर सुधाकर बडगुजर यांचे कार्यकर्ते पवन मटाले यांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले असून काहीवेळात सुधाकर बडगुजर हे माध्यमांशी संवाद साधणार आहे

आमदार नितेश राणे यांनी व्हायरल केलेला व्हिडिओ

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.