नाशिक,११ ऑक्टोबर २०२२ – सध्या मार्केट मध्ये एक नवा ट्रेन्ड येतो आहे.हा ट्रेन्ड आता नाशिकमध्ये ही सुरु झाला आहे,हर्षदा पाटील या महिला उद्योजकाने नाशिक मध्ये अम्ब्रेला कास्टिंग ( Umbrella Casting) या नावाने हि सुरुवात केली असून यामध्ये लहान बाळांचे चिमुकले हात पायांचे ठसे घेऊन ते एका आकर्षक फ्रेम मध्ये बनवून देत आहेत . त्याचबरोबर नवविवाहीत दाम्पत्यांचे वयोवृद्ध व्यक्ति (आजी, आजोबा) आणि गुरुजनांचे हात आणि पायांचे ठसे घेऊन फ्रेम करून ते वर्षोनुवर्षे जतन करता येतात स्टोन पावडरचा वापर केला असल्याने वर्षानुवर्षे जसे च्या तसे राहतात.
या विषयी बोलताना हर्षदा पाटील सांगतात मुले लहानची मोठी होत असतांना आपण त्यांचे प्रत्येक – क्षण साठवण्याचे प्रयत्न करत असतो . त्याच दरम्यान आम्हाला ही नवीन कल्पना सुचली. आणि आम्ही ती आमच्या बाळासाठी करून घेतली. ती फ्रेम पाहल्याक्षणी आनंद जो आम्हांला झाला, तो शब्दांत सांगू नाही शकत, म्हणून आम्ही हा विचार केला की हा उपक्रम जर नाशिक मध्ये सुरू केला तर आमच्या सारख्या अनेक दाम्यांताना आपल्या चिमूकूलांचे क्षण जपण्याचे संधी मिळेल.आणि तेही वाजवी दरात आपल्याला मिळणार आहे, या संधीचा फायदा घ्या.अधिक माहितीसाठी 8788918889 या मोबाईल नंबर वर संपर्क साधा असे आवाहन हर्षदा पाटील यांनी केले आहे.