छायाचित्रकार संघटनेचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द – मंत्री छगन भुजबळ
जागतिक छायाचित्रण दिनाच्या निमित्ताने मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते छायाचित्रकारांचा सन्मान
नाशिक,दि.१९ ऑगस्ट २०२३:-छायाचित्रकार संघटनेच्या असलेल्या विविध मागण्यांचा सकारात्मक विचार करून शासन दरबारी पाठपुरावा करून सोडविण्यासाठी कटिबध्द असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
जागतिक छायाचित्रण दिनाच्या निमित्ताने कालिका मंदिर सभागृहात छायाचित्रकारांचा सन्मान राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष संजय जगताप, नाईस डिजिटल प्रेसचे संजय चौधरी, प्रसिद्ध छायाचित्रकार श्री.चेतन मेहता, गीतांजली चौधरी, किशोर वाघ, अण्णा पाटील, दत्ता पाटील, सुनील जाधव,उपाध्यक्ष पंकज आहिरराव, सेक्रेटरी सुरेंद्र पगारे, सह सेक्रेटरी नंदु विसपुते खजिनदार रविंद्र सुर्यवंशी, कार्यकारणी सदस्य प्रशांत तांबट, कैलास निरगुडे, धनराज पाटील, राज चौधरी, विलास पिंगळे, बापु तांबे, योगेश चव्हाण, किरण मुर्तडक, गिरीष भोळे, संघटक दिनेश वैष्णव, हेमंत कोठावदे, विलास आहिरे, सल्लागार प्रताप पाटील, विवेक नाईक, वामन दंदी, हारून शेख यांच्यासह पदाधिकारी व छायाचित्रकार उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नव माध्यमांच्या विकासामुळे छायाचित्रांचे स्वरूप वेगाने बदलत चालले. मोबाईलचा वापर करून छायाचित्रण अधिक होत आहे. हजार शब्दातून जे लवकर व्यक्त होत नाही ते एका छायाचित्रातून व्यक्त होत असते त्यामुळे छायाचित्राला अधिक महत्व आहे. कुठल्याची विषयाची व्यापकता समजण्यासाठी छायाचित्र हे अतिशय प्रभावी माध्यम आहे. या क्षेत्रात अनेक दिग्गज मंडळींनी योगदान दिलं असल्याचे सांगत आज जागतिक छायाचित्र दिनाच्या माध्यमातून छायाचित्रकारांचा सन्मान केला जात आहे ही अतिशय कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
या छायाचित्रकारांचा झाला सन्मान
श्री.अभय ओझरकर, ,श्री. राजा पाटेकर, श्री.प्रणव सातभाई,छायाचित्रकार श्री.प्रशांत खरोटे, श्री.आनंद बोरा, श्री.संजय अमृतकर, श्री.बालाजी दंडगव्हाणे, श्री.दिलीप जगताप, श्री.सुनील जाधव, श्री.माहदेव गवळी, श्री.दत्ता राठोड, सौ.शीतल भावसार सौ.श्रद्धा चौधरी, श्रीमती स्नेहल कुलकर्णी, श्री.सलीम शेख, सौ.गीतांजली चौधरी, श्री.संजय चौधरी, श्री.नंदू विसपुते व श्री.संजय जगताप यांचा सन्मान करण्यात आला.