नाशिक शहराचे केंद्रबिंदू असलेले जुने सीबीएस बसस्थानक इतिहास जमा

0

किरण घायदार 

नाशिक,दि,२० ऑक्टोबर २०२४ –जिल्ह्याचे एक वैभव असलेले सर्व प्रवाशांचे केंद्रित मध्यवर्ती बसस्थानकाने आज खऱ्या अर्थाने अखेरचा श्वास घेतला.सीबीएससी अर्थात मध्यवर्ती बस स्थानक अति प्राचीन म्हणजे शंभर वर्षांपूर्वीचे आहे. तत्कालीन मुंबईचे मुख्यमंत्री स्व. मोरारजी देसाई यांच्या हस्ते या बसस्थानकाचे उद्घाटन झाले होते असे सांगितले जाते. डागडुजी, रंगरंगोटी द्वारे दुरुस्ती करून टिकवली जात होती. सध्याच्या काळात या वास्तूने मान टाकली असून गळती व सर्व बांधकाम जुने असल्याने काही भागाची पडझड पण होत होती.

अखेर या मोडकळीस आलेल्या वास्तू संदर्भात आमदार देवयानी फरांदे यांनी लक्ष घालून परिवहन महामंडळ व शासनाकडे पाठपुरावा करीत सुमारे दहा कोटी रुपये मंजूर केले आणि काही दिवसापूर्वीच या वास्तूच्या नूतनिक पुनर्बाधणी करिता ठराव मंजूर करून आणला. त्यानंतर या पुनर्बाधणी कामाचा भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला आणि प्रत्यक्षात आज (दि.२०) ही वास्तू पाडण्यास प्रारंभ झाला.

या बस स्थानकाच्या परिसरातील काही दुकाने इतरत्र हलविण्यात आली तर बस स्थानकाच्या लगत असलेल्या काही टपऱ्या रस्त्याच्या दिशेने सुरू करण्यात आल्या आहेत. बसस्थानकाचा पूर्ण परिसर पत्र्याने झाकला असून असंख्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने ते युद्ध पातळीवर पाडण्यात येत आहे. त्यामुळे या वास्तूने खऱ्या अर्थाने शेवटचा श्वास घेतला, असे म्हणणे योग्य ठरेल.

गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा न्यायालय शेजारील सीबीएस दुरुस्तीकरिता निधीच्या प्रतीक्षेत होते. आ. फरांदे यांनी याकडे लक्ष देऊन सीबीएसच्या पुनर्बाधणीसाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला आहे. सीबीएस येथील अतिशय मोडकळीस आलेली जुनी इमारत पाडून नवीन इमारत व आगार उभे करण्यात येणार आहे. त्याठिकाणी आता नव्याने दोन मजलीउभे करण्यात येणार आहे.

त्याठिकाणी आता नव्याने दोन मजली इमारत उभी राहणार असून तळमजल्यावर ९५० चौरस मीटरचे बांधकाम होणार आहे तर पहिल्या मजल्यावर ५९० चौरस मीटरचे काम केले जाणार आहे.नवीन इमारत व आगारासाठी सांडपाण्याची व्यवस्था देखील नव्याने करण्यात येणार आहे. सीबीएस परिसरातील ४४०० चौरस मीटर क्षेत्राचे काँक्रिटीकरण करण्यात येणार असून पेवर ब्लॉक देखील लावण्यात येणार आहे.

फायर फायटिंगमध्ये तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग यासारख्या अत्याधुनिक सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. मेळा बसस्थानकानंतर आता येथे देखील सुंदर इमारत उभी राहील. नाशिककर या वास्तूच्या प्रतीक्षेत आहेत.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.