Nashik : नोवा संघटनेच्या नव्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड
अध्यक्षपदी विक्रम कदम, सरचिटणीसपदी गणेश बोडके उपाध्यक्षपदी रवि शिरसाठ तर सहचिटणीसपदी सचिन गिते
📍 नाशिक, दि. २३ जुलै २०२५- Nashik Outdoor Advertising Association नाशिक जिल्हा आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशन (नोवा) या अधिकृत फलकधारक व्यावसायिकांच्या संघटनेच्या कार्यकारिणी निवडीत यंदाही बिनविरोध निवडीची परंपरा कायम राहिली. मंगळवारी (दि. २२ जुलै) शरणपूर रोडवरील कार्यालयात पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत २०२५–२७ या कालावधीसाठी नवी कार्यकारिणी घोषित करण्यात आली.
👉 अध्यक्षपदी स्कायसाइन ॲडव्हर्टायझिंगचे संचालक विक्रम कदम यांची,
👉 सरचिटणीसपदी मिडिया ट्रँगलचे संचालक गणेश बोडके यांची पुन्हा बिनविरोध निवड झाली.
उपाध्यक्षपदी रवि शिरसाठ (श्री आर्ट),
सहचिटणीसपदी सचिन गिते (साक्षी ॲडव्हर्टायझिंग),
खजिनदारपदी सौरभ जालोरी (सौरभ पब्लिसिटी) यांची निवड झाली.
🗳️ कार्यकारिणी सदस्यपदावर(Nashik Outdoor Advertising Association)
महेश गिरमे (साई साक्षी), गौरव माटे (गॅलरी), दीपक पवार (श्री आर्ट), विराज पवार (व्हीव्हीपी ॲडव्हर्टायझिंग) यांची निवड करण्यात आली.
🎯 या बैठकीत सिंहस्थ कुंभमेळा २०२७ संदर्भातील व्यावसायिक संधी, बाहेरील जाहिरातदारांची अतिक्रमणे, दलालांची वाढती भूमिका, महापालिकेच्या जाहिरात करातील वाढीव दरांचे प्रश्न, परवाना शुल्कात वाढ यावर चर्चा झाली. या समस्यांना सामोरे जाण्यासाठी एकत्रित रणनीती आखण्याचा निर्धार करण्यात आला.
यावेळी नंदन दीक्षित, नितीन धारणकर, विष्णुपंत पवार, मच्छिंद्र देशमुख, संजय मालुसरे, इम्तियाज अत्तार, अमित पाटील, बंटी धनविजय, निखिल सुराणा, हर्षद कुलथे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.