Nashik : राज्यात ओझर सर्वाधिक थंड : उत्तर महाराष्ट्रात थंडीच्या लाटेची शक्यता
महाराष्ट्रात प्रमुख जिल्यातील किमान तापमान जाणून घ्या
मुंबई,२१ नोव्हेंबर २०२२ – राज्यात नाशिक जळगाव धुळे नंदुरबार अहमदनगर सह मराठवाड्यातील काही जिल्ह्यातील किमान तापमानात घट झाली आहे. या जिल्ह्यातील काही ठिकाणी तापमान १० अंश सेल्सिअस खाली राहण्याचा अंदाज आहे. तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तापमान १२ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील ओझरमध्ये आज ५.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. एचएएलच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये ही नोंद करण्यात आली. यंदाच्या हंगामातील आतापर्यंतचं हे निचांकी तापमान आहे.परिणामी कडाक्याच्या थंडीने ओझरकर गारठले आहेत. निफाड आजचे किमान तापमान ७ अंश सेल्सिअस एवढं आहे.तर नाशिक शहरात ९.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, पुढील २४ तास महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.उत्तर महाराष्ट्रातीलच धुळे शहरासह जिल्ह्यातील तापमानात सध्या घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील तापमान सात अंशावरती आले असून या वाढत्या थंडीचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. यासोबतच पुढील काही दिवसांमध्ये उत्तर महाराष्ट्राचा पारा देखील आणखी घसरणार असल्याचं हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
नाशिक ओझर आणि धुळे जिल्ह्याच्या तापमानात सध्या मोठ्या प्रमाणावर घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिक सकाळीच घराबाहेर पडताना उबदार कपड्यांचा आधार घेत असून ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. पुढील काही दिवसात हा पारा आणखी घसरणार असल्याचे हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आलं आहे
महाराष्ट्रात प्रमुख जिल्यातील किमान तापमान
सातारा १३, सोलापूर १२.७.नाशिक ९.२,नांदेड १२.२, कोल्हापूर १४.८ ,औरंगाबाद ८.९ ,परभणी ११, जळगाव ८.२ पुणे ८.८ ,MWR १० .४ उदगीर ११.५ जालना ११ .६ बारामती ९.७ ,उस्मानाबाद १२, अहमदनगर ९.७ ,राहुरी ८.५ ,कोपरगाव ११.४