नाशिक मध्ये हंगामातील सर्वात जास्त तापमानाची नोंद:तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे
उष्माघात टाळण्यासाठी काय कराल ?:काय आहार घ्यावा
नाशिक,दि,७ एप्रिल २०२५ – गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर आता नागरीकांना आता उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहे. काल नाशिक सह छत्रपती संभाजीनगर माहे हंगामातील सर्वात जास्त तापमानाची नोंद झाली आहे. काल नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये ४०.२ अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदवण्यात आले असून हंगामांतील सर्वात जास्त तापमानाची नोंद करण्यात आली आहे. आज ही तापमानतात वाढ होईल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा जरी आला असला तरी शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. .हाती आलेल्या माहिती नुसार आज नाशिकमध्ये तापमान ३८.२ अंश सेल्सिअस ते ४२.६ अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे, मागच्या आठवड्यात कमाल तापमान ३९.१ अंश सेल्सिअस एवढी नोंद करण्यात आली होती तर किमान २२. ७ अंश सेल्सिअस एवढी नोंद करण्यात आली होती..
उन्हाळ्याच्या दिवसात वातावरणातील उष्णता वाढते आणि त्याचा शरीरावर बदल होतो. डिहायड्रेशन, उष्माघात, भूक मंदावणे, उन्हाळा लागणे, अॅसिडिटी, डोकं दुखणं, अस्वस्थ वाटणं, थकवा जाणवणं या समस्या उद्भवतात. आपापल्या प्रकृतीनुसार, तसंच आहार-विहारानुसार ही लक्षणं कमी-अधिक असू शकतात. मात्र या वातावरणाशी जुळवून घेणं थोडंसं कठीण होतं. आपलं शरीर या बदलांना जुळवून घेत शरीराच तापमान नियंत्रित राखण्याचा प्रयत्न करते. मेंदूतील हायपोथॅलिमस हा भाग हे तापमान नियंत्रित करतो. शरीरात पाण्याची कमतर जाणवू लागल्यास स्नायूंच्या प्रणालीद्वारे हा संदेश मेंदूला पोहोचवला जातो आणि तहान भागवण्याची क्रिया घडते.या दिवसात भरपूर पाणी प्यावे असे डॉक्टरान कडून सांगण्यात येते आहे. शक्यतो उन्हामध्ये बाहेर पडू नका असे हि आवाहन करण्यात आले आहे.
नाशिकचे आजचे तापमान (दि ७ एप्रिल) ४०.३ अंश सेल्सिअस
उन्हाळ्यात काय आहार घ्यावा
या काळात शक्यतो पचायला हलका व कमी आहार घ्यावा. यामध्ये मुगाची खिचडी किंवा वरण-भात तसेच, सर्व पालेभाज्यांचे प्रमाण आहारात वाढवावे. टरबूज, खरबूज, संत्री, मोसंबी, केळी, काकडी, द्राक्षे आदी फळांचे सेवन वाढवावे.थंड तुपाचाही आहारात समावेश करावा. नारळ पाणी, ऊसाचा रस, कोकम सरबत, नीरा तसेच फळांचा ताजा रस घ्यावा, जेवणानंतर ताकही घ्यावे.
अधिकाधिक पाणी प्या!
उन्हाळ्यात घामाच्या रुपाने उष्णता बाहेर पडत असते. त्यामुळे आतून व बाहेरून शरीराची त्वचा कोरडी पडते. अशावेळी उन्हाळ्यात शरीराला पाण्याची अत्यंत गरज असते. त्यामुळे वेळोवेळी थंड पाणी पीत राहावे. थंड पाणी फ्रीज मधील नाही तर माठातील असावे. उन्हातून आल्यानंतर तत्काळ पाणी पिणे टाळावे.
उष्माघात टाळण्यासाठी काय कराल?
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने तसेच, शरीरातील पाण्याच्या प्रमाणाचा समतोल बिघडल्याने चक्कर येते. अचानक डोळ्यासमोर अंधारी येते. अशावेळी रुग्णाला थंड वातावरणात शांत झोपवावे, शरीर थंड पाण्याने पुसून घ्यावे. डोक्यावर बर्फाची पिशवी ठेवावी.उष्माघाताचा त्रास होत असलेल्या रुग्णाला जास्तीतजास्त द्रव आहार द्यावा, लिंबू सरबत घ्यावे, ताप आला तर डॉक्टरांना दाखवावे, उन्हात घराबाहेर पडणे टाळावे. या काळात डॉक्टरदेखील हाच सल्ला देतात.