नाशिक– नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी बांधकाम व्यावसायिक दीपक चंदे यांनी कालच २५ लाखाची देणगी जाहीर केली स्वागताध्यक्ष ना. छगन भुजबळ यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आज नाशिकच्या दि नाशिक मर्चंट को-ऑप बॅकेने ११ लाख रुपयांचा धनादेश संमेलनाचे स्वागताध्यक्ष व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे सुपूर्द केला.
हे नाशिककरांचे संमेलन असून त्यासाठी नाशिककरांनी तन मन धनाने पुढे यावे असे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष ना. छगन भुजबळ यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत अनेक संस्था पुढे येत असून उत्तर महाराष्ट्राची आर्थिक वहिनी असलेली दि नाशिक मर्चंट को-ऑप बॅकेने ११ लाख रुपयांचा धनादेश संमेलनाचे स्वागताध्यक्ष व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे सुपूर्द केला.
नाशिक मर्चट को ऑप बॅकेचे चेअरमन हेमंत धा्त्रक यांनी सोमवार ( १ नोव्हेंबर ) रोजी माजी मंत्री जयकुमार रावल, पंकजताई मुंडे यांच्या उपस्थितीत देण्यात आला. यावेळी स्वागताध्यक्ष भुजबळ म्हणाले की नामको बॅकेने नेहमीच सामाजिक कामाला मदत केली आहे. अनेक संस्थांना मदतीचा हात दिला आहे. नाशिक मध्ये होऊ घातलेल्या संमेलनासाठी त्यांनी मदत दिल्याने मोठा आधार मिळाला आहे.
संमेलनासाठी अनेक संस्था मदत करीत असून यापुढेही संस्थांनी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी चेअरमन हेमंत धात्रक, उपाध्यक्ष प्रकाश दायमा, जनसंपर्क संचालक शोभा छाजेड, ज्येष्ठ नेते व संचालक वसंत गीते, सोहनलाल भंडारी, विजय साने यांच्यासह संचालक मंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते. साहित्य संमेलनाचे प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर यांनी नामको बॅकेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.