नाशिक,दि,४ जानेवारी २०२५ –नाशिककर ज्याची आतुरतेने वाट बघत असतात अशी नाशिककरांच्या आवडीची आणि पसंतीची हि ‘रन फॉर फन’ चे आयोजन शनिवार दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी सकाळी साडेसात महात्मा नगर येथील मैदानावरून सुरु करण्यात येणार आहे. ज्याचा मार्ग मोठ्यांसाठी ४.५ किलोमीटर व लहानांसाठी २.५ किलोमीटर असा आहे. ह्या वर्षी नाशिक रन त्याचे सातत्य राखत २३ व्यांदा सलग आयोजित होत आहे,
नाशिक रन २०२४ ला नाशिककरांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल नाशिक रन चारीटेबले ट्रस्ट चे विश्वस्त नाशिककरांचे आभारमानले आहे. .खरं तर सन २०२१ आणि २०२२ मध्ये जागतिक महामारीच्या काळात छोट्या स्वरूपात रन चे आयोजन केल्या नंतर सन २०२३ व २०२४ मध्ये पहिल्या प्रमाणे मोठ्या स्वरूपात रन चे आयोजन केले ज्यास नाशिककरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने आमचा उत्साह वाढू शकला. व त्याच अनुषंगाने नाशिक रन २०२५ हा उपक्रम पुन्हा भव्य स्वरूपात आयोजित करण्याचे आम्ही योजिले आहे. अशी माहिती विश्वस्थांनी पत्रकार परिषदेत दिली.
नाशिक मधील काही समविचारी कंपन्यांनी एकत्र येऊन २००३ साली सुरू केलेल्या या उपक्रमाचे आयोजन BOSCH व TDK या कंपन्या करतात. त्यांचा प्रमुख उद्देश हा केवळ कार्यक्रम आयोजित करणे नसून समाजातील गरजू व दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगीण विकास घडण्याकरिता मदत करणे हा आहे. या उद्देशाला पुढे नेण्याकरिता नाशिककरांनी सातत्याने पाठिंबा दिला आहे. नाशिक रन कडे देणगी रूपाने जमा होणारा सर्व निधी हा ट्रस्टच्या कुठल्याही कार्यालयीन कामासाठी खर्च केला जात नाही. सदर ट्रस्टचा व्यवस्थापन खर्च हा बॉश व टिडिके या कंपन्या स्वतः करतात. अशा प्रकारे देणगीदारांनी नाशिक रन साठी दिलेला निधी हा संपूर्णपणे सामाजिक उपक्रमांसाठी वापरला जातो. नाशिक रन ट्रस्ट साठी दिलेली देणगी ही 80 G नुसार आयकरात सूट मिळण्यास पात्र आहे.
प्रत्येक वर्षी विविध उपक्रमांद्वारे नाशिक रन गरजूंपर्यंत पोहोचते. हे उपक्रम नाशिक रन स्वतः किंवा समाजातील चांगले काम करणाऱ्या NGO द्वारे पार पाडत असतात. आतापर्यंत नाशिक रनद्वारे ४०० पेक्षा अधिक उपक्रमांद्वारे समाजातील वंचित घटकांना मदत पोहोचवण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने शैक्षणिक संस्थांना पायाभूत सुविधा पुरविणे, आरोग्याशी संबंधित उपक्रम राबवणे व खेळासाठी तरुणांना प्रोत्सहन देणे, या गोष्टींचा समावेश होतो.
नाशिक रन २०२५ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काय करावे लागेल
नाशिक रन २०२५ च्या नोंदणी करीता लहानांसाठी रू. २५०/- प्रत्येकी तर मोठ्यांसाठी रु. ३००/- प्रत्येकी अशी ठेवण्यात आलेली आहे. प्रत्येक नोंदणी धारकास आकर्षक असा ‘नाशिक रन २०२५ ‘चा टी-शर्ट मोफत देण्यात येईल. या रन मध्ये भाग घेणाऱ्यास नाशिक रनचा टी-शर्ट परिधान करणे आवश्यक आहे. लहानांसाठी २६,२८,३०,३२,३४ तर मोठ्यांसाठी ३६,३८,४०,४२,४४ या साईज मध्ये टी-शर्ट उपलब्ध आहेत. नाशिक रन २०२५ करिता नोंदणीसाठी नोंदणी स्टॉल शनिवार दिनांक ०४ जानेवारी २०२५ पासून महात्मा नगर ग्राउंड येथे सकाळी १० वाजेपासून संध्याकाळी ६ वाजे पर्यंत सुरु झाला आहे. २० पेक्षा जास्त नोंदणी करणाऱ्या ग्रुप ने श्री. नितीन देशमुख यांच्याशी मोबाइल नंबर ९७६५४ ९९२३६ वर संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिक मधील नामवंत प्रायोजकांद्वारे सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी लकी ड्रॉ बक्षीसांचे आयोजन करण्यात आलेले आहे. जे नागरिक मैदानावर हजर असतील तेच बक्षीस पात्र असतील. नाशिक रन च्या विश्वस्तांमार्फत सर्व नाशिककरांना या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नाशिक रन बद्दलच्या इतर माहिती करिता ९७६५४ ९९२३६ ह्या नंबर वर संपर्क करता येइल.
कोरोनाच्या कठीण काळात नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्ट द्वारे मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली.२०२४ मध्ये नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्ट द्वारे केल्या गेलेल्या उपक्रमांची माहिती खालील प्रमाणे आहे.
श्रीकवरबाई मंगलचंद जैन एज्युकेशन सोसायटी, वाघदर्डी, चांदवड.
सायन्स लॅब व वर्ग खोली
श्री कपालेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, तळवाडे, सटाणा
चार वर्ग खोल्या व ११२ बेंचेस
आदिवासी उन्नती मंडळ, वैतरणा नगर, इगतपुरी, नाशिक
शाळेचे नूतनीकरण
ग्यानगंगा एज्युकेशन ट्रस्ट, अंजनेरी, नाशिक.
ऑफिस फर्निचर
श्री हनुमान शैक्षणिक संस्था, सोग्रास, चांदवड
शाळेचे नूतनीकरण
आदिवासी उन्नती मंडळ, वैतरणा नगर, इगतपुरी, नाशिक
भोजनगृहचे नूतनीकरण
डांग सेवा मंडळ, शिंदे, दिंडोरी, नाशिक
शाळेतील जुने छत बदलवून नवे बसविणे व रंगकाम करणे
संत ज्ञानेश्वर विद्यालय, वाहेगाव, चांदवड, जिल्हा नाशिक
१०० बेंचेस द्वारे २०० विद्यार्थ्यांना लाभ
श्री कपालेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, पळसदरे, नाशिक
शाळेतील वर्गखोल्यांचे फ्लोअरिंग चे नूतनीकरण
श्रीकवरबाई मंगलचंद जैन एज्युकेशन सोसायटी, वाघदर्डी, चांदवड.
३१ विद्यार्थिनींना सायकली
आदिवासी उन्नती मंडळ, वैतरणा नगर, इगतपुरी, नाशिक
१९ विद्यार्थिनींना सायकली
होमिओपॅथी इन हिमोफिलिया – डॉ. कुंडू – नाशिक
हिमोफिलिया आजार असलेल्या गरीब मुलांसाठी औषधोपचारास मदत
Online registration is possible? Please send the link