नाशिक – सार्वजनिक वाचनालयाची पंचवार्षिक निवडणूक जाहिर झाली आहे.संस्थेच्या सन २०२२-२०२७ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ अॅड.एस. जी. सोनवणे यांनी काल दिनांक १३ एप्रिल,२०२२ रोजी सावाना कार्यालयात सूत्रे स्वीकारली. सावाना पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेस प्रारंभ झाल्याचे जाहीर केले. याप्रसंगी सावानाची लिखित घटना व दिनांक १२ एप्रिल,२०२२ रोजी प्रसिद्ध केलेल्या सावाना सभासद मतदानास पात्र मतदारांची अंतिम यादी अॅड.एस. जी.सोनवणे यांचेकडे कार्याध्यक्ष संजय करंजकर, प्रमुख सचिवजयप्रकाश जातेगावकर यांनी सुपूर्द केली.
त्यांना निवडणूकप्रक्रिया व कामकाजात सावाना सहा. व्यवस्थापिका सौ. योगिनी जोशी या सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्य करणार आहेत. सावानाच्या दुसऱ्या मजल्यावरील बालविभागात निवडणूक निर्णय अधिकारी अॅड.एस. जी. सोनवणे सावाना निवडणुकीचे कामकाज बघणार आहेत. यावेळी सहा. सचिव प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे नाट्यगृह सचिव अॅड. अभिजीत बगदे डॉ. धर्माजी बोडके उपस्थित होते.
‘सावाना’ची पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे