नाशिक १०,फेब्रुवारी २०२३ – ‘संवाद सहवास’ नावाचा अनोखा उपक्रम अक्षर मानव संघटने कडून नियमित घेतला जातो. रविवार,दि.१२ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजित या उपक्रमात प्रसिद्ध लेखक व पत्रकार निरंजन टकले यांच्याशी नाशिककरांना संवाद साधता येणार आहे .सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत डिझास्टर मॅनेजमेंट सेन्टर अँड ट्रेनिंग हब (विश्वास गार्डन शेजारी), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँक समोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.येथे हा उपक्रम आयोजित केला आहे.अशी माहिती अक्षर मानव जिल्हाध्यक्ष संगीता फुके यांनी दिली आहे.
समाजात राबलेल्या एका मान्यवर, अभ्यासू व्यक्तीला बोलवावं आणि सलग त्या व्यक्तीच्या संगतीत राहावं, त्याला, त्याच्या कामाला समजून घ्यावं आणि आपण, आपला समाज उन्नत होण्यासाठी काही घावतंय का ते शोधावं, असा एक ‘संवाद सहवास’ नावाचा अनोखा उपक्रम अक्षर मानवकडून नियमित घेतला जातो.
या आधीचे संवाद सहवास डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. गणेश देवी, डॉ. अनिल अवचट, डॉ. तारा भवाळकर, निखिल वागळे, विनायकदादा पाटील, कुमार केतकर, राजदत्त, नागराज मंजुळे, नागेश भोसले, अतुल पेठे, रामदास फुटाणे, हरी नरके, संजय आवटे, डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. राजेंद्र धामणे आणि डॉ. सुचेता धामणे, सयाजी शिंदे यांच्याशी झाले.अठरावा संवाद सहवास प्रसिद्ध लेखक व पत्रकार निरंजन टकले यांच्याशी साधला जाणार आहे,
यासाठी मोलाचे सहकार्य मा.श्री. विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंबप्रमुख विश्वास ग्रुप यांचे लाभले असून यासाठी कसलीही प्रवेश फी नाही. नावनोंदणीसाठी 9325995754, 9420362195 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन अक्षर मानव चित्रपट विभागाचे राज्य सचिव गणेश शिंदे व अक्षर मानव जिल्हाध्यक्ष सौ. संगीता फुके व नाशिक अक्षर मानव संघटनेने केले आहे.