नाशिक,दि,२९ एप्रिल २०२४ –नाशिक लोकसभा मतदार संघातून महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नसला तरी अपक्ष निवडणूक लढवत असलेले शांतीगिरी महाराज यांनी उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना शिंदेगटाकडून अर्ज भरला आहे. यामुळे नाशकात मोठी खळबळ उडाली आहे.
महायुतीत नाशिक लोकसभा मतदार संघाचा तिढा कायम असतानाच ही मोठी बातमी समोर आल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. गेल्या २ टर्म पासून नाशिकचे लोकसभेमध्ये नेतृत्व करणारे हेमंत गोडसे यांनी शिवसेना शिंदे गटाकडून प्रचार सुरु केला जरी असला तरी ते अद्याप वेटिंगवर आहेत मध्यंतरी शांतिगिरी महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.
त्यातच काल शांतिगिरी महाराज याचे शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेतली आणि आज शांतिगिरी महाराज यांनी शिवसेना शिंदे गटाकडून आपला फार्म भरल्यामुळे शिवसेना शिंदे गटा कडून शांतिगिरी महाराज उमेदवारी मिळणार का अशी शक्यता निर्माण झाली आहे, मात्र शांतिगिरी महाराजांना अद्याप एबी फॉर्म मिळाला नसला तरी ३ तारखेच्या आत आपण शिवसेनेचा एबी फॉर्म सादर करावा असे पत्र जिल्हाधिकारी कार्यलयाकडून शांतिगिरी महाराजांना पाठवण्यात आले आहे.
शांतीगिरी महाराज हे नाशिकमधून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याची माहिती होती. त्यांनी आज गोदाघाट येथे आपल्या भक्त परिवारासह जोरदार शक्ती प्रदर्शन केले. त्यानंतर ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले.
मात्र उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे नाशकात मोठी खळबळ उडाली आहे. अद्याप महायुतीकडून अधिकृत उमेदवारीची घोषणा झालेली नाही. मात्र शांतीगिरी महाराज हे महायुतीचे उमेदवार असणार का? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
शांतीगिरी महाराजांना अद्याप एबी फॉर्म नाही
मात्र अर्जासोबत एबी फॉर्म जोडण्यात आला नाही. महायुतीचा उमेदवार कोण? अशी चर्चा सुरू असतानाच स्वामी शांतिगिरी महाराज यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या नावाने अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शांतीगिरी महाराज यांनी यापूर्वी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. शांतीगिरी महाराज यांनी एकूण चार अर्ज घेतले आहेत. आज दुसरा अर्ज भरण्यात आला आहे.