नाशिक,२७ ऑगस्त २०२२ – राष्ट्रीय क्रिडा दिनाचे औचित्य साधत, नाशिक स्मार्ट सिटी फाउंडेशन व नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने रविवार २८आँगस्ट रोजी जिल्हास्तरीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा जलद प्रकारात (रँपिड) खेळवण्यात येणार आहेत. सिटी सेंटर मॉलसमोरील लक्षीका मंगल कार्यालयात या स्पर्धा होणार आहेत. यासाठी ग्रामीण भागातील खेळाडूंना फ्री तर शहरातील खेळांडूकडून ५० रूपये नाममात्र शुल्क आकरण्यात येणार आहे.
या स्पर्धा खुल्यागटात खेळवण्यात येणार असुन ०७,०९,११,१५ वर्षाखालील गटात प्रत्येकी प्रथम ७५०/-रु व द्वितीय ५००/- रुपये रोख बक्षीसे देण्यात येणार असुन खुल्यागटात प्रथम ३०००/- रु, द्वितीय १५००/-रु, तृतीय १०००/- रु, चॊथ्या व पाचव्या क्रमांकास प्रत्येकी ८००/- रु तसेच सहाव्या, सातव्या क्रमांकास प्रत्येकी ७००/- रु, आठव्या ते दहाव्या क्रमांकापर्यंत प्रत्येकी ५००/- रु रोख बक्षीसे देण्यात येणार आहे . या व्यतिरिक्त उत्कृष्ट खेळी करणाऱ्या २ महिलांना प्रत्येकी ५००/- रु तसेच उत्कृष्ट दिव्यांग व उत्कृष्ट वयोवृद्ध खेळाडूला प्रत्येकी ५००/- रोख बक्षीस देण्यात येणार आहे. सर्व सहभागी खेळाडूंना डिजिटल सर्टिफिकेट देण्यात येणार आहे.
सदर स्पर्धेसाठी पुर्व नोंदणी २७ आँगस्ट पर्यत करता येइल. स्पर्धेच्या ठिकाणी आयत्यावेळी आलेल्या स्पर्धकांना खेळता येणार नाही. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करुन फाँर्म भरणे आवश्यक आहे. लिंक : https://forms.gle/59E3Az3vrvaZ4QJZA लिंकवर क्लिक करण्याआधी संघटनेच्या खात्यात पैसे भरणे आवश्यक.
याबाबतची अधिकची मिळण्यासाठी भुषण पवार : ७८४१९२४८४१ , सुनिल शर्मा : ९३७३९०६००५ ,मंगेश गंभीरे : ७०३८८९३६२९ ,विनायक वाडिले : ८८८८११९३३५ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.