नाशिक,दि. ६ ऑक्टोबर २०२३ – ऋग्वेद ह्या नाशिकच्या सांस्कृतिक विश्वात कार्यरत असणार्या संस्थेतर्फे प्रथमच .प्रमोद भडकमकर ह्यांच्या स्मृती प्रीत्यर्थ राज्यस्तरिय एकल तबला वादन स्पर्धा (State Level Solo Tabla Competition )आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीनंतर १५ स्पर्धकांची अंतिम फेरी साठी निवड करण्यात आली असून अंतिम फेरी कुसुमाग्रज स्मारक येथे ८ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० वाजेपासून सुरू होईल
तर सायंकाळी ६ वाजता पुरस्कार वितरण समारंभ होणार असून या कार्यक्रमात पंडित अजिंक्य जोशी यांचे व स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेत्याचे एकल तबला वादन होणार आहे.
सदर कार्यक्रमास कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांचे विशेष सहकार्य मिळाले असून कार्यक्रमास सर्वांना मुक्त प्रवेश आहे.तरी नाशिककर रसिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन ऋग्वेद संस्थेतर्फे करण्यात आले आहे.