Nashik : नदी प्रदूषण रोखण्यास मनपाच्या प्रयत्नांना यश

१४४ मेट्रिक टन निर्माल्य आणि १ लाख ९७ हजार मूर्तींचे संकलन  

0

नाशिक,१० सप्टेंबर २०२२ – नाशिक महानगरपालिकेचे मा. आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून नदीपात्राचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने प्रयत्न होते. त्याला प्रतिसाद मिळाला आहे. ९ सप्टेंबरला गणेश विसर्जनात सुमारे १४३.९०५ मेट्रिक टन निर्माल्य संकलित करण्यात आले आहे. १ लाख ९७ हजार ४८८ गणेश मूर्तींचेही संकलन झाले आहे.

मूर्तींचे नदीपात्रात विसर्जन न करता मनपाच्या विसर्जन स्थळांवर मूर्ती आणि निर्माल्य संकलित झाले आहे. मनपाच्या सहा विभागात एकूण ७१ नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन ठिकाणांवर मूर्ती आणि निर्माल्य संकलित झाले आहे. बांधकाम विभागाने कृत्रिम तलाव उभारले होते. घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्वच्छतेबाबत नियोजन करून निर्माल्य संकलित केले आहे. ‘मिशन विघ्नहर्ता २०२२ फिरता तलाव’ या उपक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळाला.

सामजिक संस्थांची मदत
निर्माल्य जमा करण्यासाठी शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांनी मदत केली आहे. के. के. वाघ कॉलेजचे ट्रस्टी अजिंक्य वाघ, प्रा. स्वानंद डोंगरे आणि ३०० विद्यार्थी,  वृक्षवल्ली फाउंडेशन, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे  संस्कार सोनवणे व त्यांचे २० स्वयंसेवक , बिटको कॉलेजचे  विजय सुकटे व त्यांचे १०० स्वयंसेवक , दिल्ली पब्लिक स्कूलच्या साक्षी बनसोडे व त्यांचे १६ विद्याथी , पोलिस मित्र आडगाव पोलीस स्टेशन यांचेकडील ५० स्वयंसेवक, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाचे ५० स्वयंसेवक, नाशिक रोड गुरुद्वारा, रोटरी क्लब ऑफ गोदावरी, रोटरी क्लब ऑफ वेस्ट, रोटरी क्लब ऑफ नाशिक सिटी यांच्या प्रत्येकी २५ सदस्य आणि भोसला मिलिटरी स्कुलच्या १००  कॅडेटनी उपस्थित राहून मूर्ती संकलनात सहभाग नोंदवला आहे.

घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा विभागाचे स्वच्छता निरीक्षक आणि विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेउन मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली.  शहर अभियंता शिवकुमार वंजारी, उपायुक्त मनोज घोडे-पाटील, उपायुक्त डॉ. दिलीप मेनकर, उपायुक्त करुणा डहाळे, उपायुक्त अर्चना तांबे,  उपायुक्त विजयकुमार मुंढे, सहा विभागाचे विभागीय अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. बांधकाम,  विद्युत विभागाचे सहकार्य लाभले.

१४४  मेट्रिक टन निर्माल्य संकलन  
पूर्व विभाग – 21290 किलो ग्रॅम
पश्चिम विभाग – 13940 किलो ग्रॅम
नाशिक रोड – 20545 किलो ग्रॅम
पंचवटी विभाग – 36010 किलो ग्रॅम
सिडको विभाग – 22275 किलो ग्रॅम सातपूर विभाग – 29845 किलो ग्रॅम
एकूण – 143.905 मेट्रिक टन

१ लाख ९७ हजार ४८८ मूर्ती संकलित

शुक्रवारी ९ सप्टेंबरच्या गणेश विसर्जनात मनपाने  सुमारे १ लाख ९७ हजार ४८८ मूर्ती संकलित केल्या आहेत. 
अ.क्र विभाग          मुर्ती संकलन संख्या
1      पंचवटी           72866
2      सिडको           17828
3      नाशिक रोड      50597
4      नाशिक पश्चिम 10508
5      नाशिक पूर्व    20478
6      सातपूर           25211
एकुण           1,97,488

टॅंक ऑन व्हील (फिरता तलाव)
नाशिक रोड-31
पंचवटी 72
सिडको 146
सातपूर 132
एकूण – 381

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.