नाशिक साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुक्रवारी शुभारंभ
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची राहणार उपस्थिती
नाशिक,१९ऑक्टोबर,२०२२- सहकारी साखर कारखाना लि. पळसे, संचलित मे. दिपक बिल्डर्स् अॅण्ड डेव्हलपर्स या कारखान्याचा सन २०२२-२३ या गळीत हंगामाचा शुभारंभ शुक्रवार दि.२१ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, युवराज संभाजीराजे छत्रपती, सहकार मंत्री अतुलजी सावे, यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होत असल्याची माहीती कारखान्याचे चेअरमन खा. हेमंत गोडसे यांनी दिली.
गेली ९ वर्ष बंद असलेला नाशिक साखर कारखाना खा. हेमंत गोडसे यांच्या माध्यमातुन सुरू होत आहे. मे २०२२ मध्ये कारखान्याचा चाचणी गळीत हंगाम यशस्वी झाल्यानंतर व्यवस्थापन व प्रशासनाने मशीनरी दुरूस्ती सह शेतकी विभागामध्ये सक्षम ऊस तोड यंत्रणा कार्यान्वीत करीत, इतरही योग्य ते बदल करून कारखाना चालु गळीत हंगामासाठी सज्ज केला आहे. या हंगामात ३.५० लाख मे.टन गळपाचे उदिष्ठ ठेवण्यात आलेले आहे. चालु गळीत हंगामाचा बॉयलर ८ ऑक्टोंबर रोजी पेटविल्यानंतर गळीत हंगामाचा शुभारंभ २१ ऑक्टोंबर २०२२ रोजी होत असून या कार्यक्रमासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार, जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे, महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्राम विकास मंत्री गिरीशजी महाजन यांचे सह आ. सुहास कांदे, आ. अॅड. राहुल ढिकले, आ. सिमा हिरे, आ. देवयानी फरांदे, आ. अॅड. माणिकराव कोकाटे, आ. सरोजताई आहीरे, आ. हिरामण खोसकर, जिल्हा बँक प्रशासक अरूण कदम, सी.इ.ओ. शैलेश पिंगळे, प्राधिकृत अधिकारी दिपक पाटील, कारखाना अवसायक बबनराव गोडसे, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हा गळीत हंगाम कारखान्याच्या इतिहासात टर्निंग पॉइंट ठरणार असून नाशिक, सिन्नर, इगतपुरी व त्रंबकेश्वर या चार तालुक्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांची गेली ९ वर्ष झालेली हेळसांड व कामगारांचे झालेले हाल यामुळे हा गळीत हंगाम महात्वपुर्ण ठरणार आहे. तरी या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी शेतकरी, उस उत्पादक, सभासद, कामगार, व इतर घटकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन चेअरमन खा. हेमंत तुकाराम गोडसे, संचालक दिपक कल्याणजी चंदे, शेरझाद होशी पटेल, सागर हेमंत गोडसे, कार्यकारी संचालक सुकदेव काशिनाथ शेटे यांचेसह अधिकारी, कर्मचारी व उस उत्पादक शेतकरी यांनी केले आहे.