Nashik : नारळाच्या झाडावर चक्क दोन बिबटे : थरारक व्हिडीओ व्हायरल 

परिसरात भीतीचे वातावरण : पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी

0

नाशिक,१८ सप्टेंबर २०२२ – सिन्नर तालुक्यातील सांगवीमध्ये भरदिवसा दोन बिबटे चक्क नारळाच्या झाडावर चढले.धनगरवाडी रस्त्यावरील दिलीप कोंडाजी घुमरे, सुनील सखाहारी घुमरे यांच्या घराशेजारी व शांताराम विठोबा घुमरे यांच्या नारळाच्या झाडावर एका बिबट्याचा पाठलाग करतांना दुसरा बिबट्या चढतानांची घटना त्याच वस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांनी मोबाईलवर आज सकाळी चित्रीत केलेला व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.

या परिसरात बिबट्यांचे नेहमीच दर्शन होत असते. मात्र, दोन बिबट्यांची अशी झटापट पहिल्यांदाच बघायला मिळाली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धनगरवाडी सोमठाणे  हा रस्ता रहदारीचा असून परिसरात अनेक शेतकऱ्यांची घरे रस्त्यांवरच आहे. बिबट्यांची ही करामत स्थानिकांना आनंद देऊन गेली असली तरी बिबट्यांचा वावर परिसरात असल्याने परिसरात भीतीचे वातावरणही पसरले आहे.

दरम्यान, या परिसरात एक अंगणवाडी असून अंगणवाडीतील मुलेही याच रस्त्याने नेहमी ये-जा करत असतात. त्यामुळे  परिसरात पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!