Nashik :आर्किटेक्चरची नवीन संकल्पना असलेल्या ‘ओरिटेक्चर’ वर अनोखे प्रदर्शन

आयडिया कॉलेजचे ‘१०वे एक्सक्लेम २०२२’ वार्षिक प्रदर्शन

0

नाशिक-(प्रतिनिधी)आपल्याकडे ‘ओरिगामी’ ला लहान मुलांची एक कला असं मर्यादित स्वरूपात पाहील जात. याहून पुढे त्याचा विचार होत नाही. मात्र ओरिगामीचे मुळीच इतके मर्यादित स्वरूप नाही. हीच गोष्ट अभ्यासण्यासाठी आयडिया कॉलेजने पुढाकार घेतला आहे. यंदाचे ‘एक्सक्लेम २०२२’ हे वार्षिक प्रदर्शन ‘ओरिटेक्चर’ या विषयावर आयोजित करण्यात आले आहे. सोबतच विविध विषयावर कार्यशाळा, कला प्रदर्शन, फोटोग्राफी प्रदर्शन आणि चित्र प्रदर्शनदेखील भरविण्यात आले आहे. येत्या १४ ते १७ एप्रिल २०२२ दरम्यान शहरातील कुसुमाग्रज स्मारकात सदरचे प्रदर्शन संपन्न होत असून ते सर्वांसाठी खुले आहे. सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत प्रदर्शनाला भेट देता येणार आहे.

विद्यावर्धन ट्रस्ट यांचे इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन इनव्हारमेन्ट अॅण्ड आर्किटेक्चर (Institute for Design Environment and Architecture) अर्थात ‘आयडिया कॉलेज’ नाशिकमध्ये कार्यरत आहे. कॉलेजमध्ये शिकत असतांना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा यासाठी दरवर्षी एक्सक्लेम हे वार्षिक प्रदर्शन भरविले जाते. यंदा ‘ओरिटेक्चर’ अर्थात ओरिगामी आणि आर्कीटेक्चर यांचा संगम यावर सदरचे प्रदर्शन आहे.

Unique exhibition on ‘Architecture’, a new concept of architecture

 

दिवसेंदिवस ओरिटेक्चरचा वापर वाढत आहे. यात आर्कीटेक्चर, डिझाईन, इंटेरियर डेकोरेशन  यामध्ये वापर होत आहे. ओरिगामीमध्ये कुठेही कापणे, चिकटवणे याचा वापर केला जात नाही. तर फक्त अवघ्या काही घड्याच्या मदतीने आकृती घडविले जाते. आणि याचा वापर आर्किटेक्चरमध्ये येत असलेल्या जागेसाठी होतो. यामुळे उपलब्ध जागा अधिक आकर्षक बनते. तर ओरिटेक्चरचे आकृत्याही सुंदर आणि टिकाऊ असतात. अशा सुमारे ५ इंच ते ५ फुटापर्यतच्या आकृत्या या प्रदर्शनात मांडल्या जाणार आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या अभ्यासाचे सादरीकरणदेखील केले जाणार आहे. तरी नाशिककरांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन आयडिया कॉलेजकडून करण्यात आले आहे.
Unique exhibition on ‘Architecture’, a new concept of architecture
अशी आहे ‘ओरिटेक्चर’ सांगणारी निमंत्रण पत्रिका
नेहमीच एक्सक्लेमची निमंत्रण पत्रिका चर्चेचा विषय ठरत असते. यंदाही हीच परंपरा कायम राखत अतिशय बोलकी पत्रिका विद्यार्थ्यांनी बनवली आहे. यात कागदाला विशिष्ट पद्धतीने घडी घालून आकृती तयार केली आहे. आणि त्यावर निमंत्रण लिहिण्यात आले आहे. त्यामुळे एक एक घडी उघडली की माहिती मिळत जाते.

 

 

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.