नाशिक –ज्येष्ठ सुलेखनकार नंदू गवांदे यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा,मुलगी जावई असा परिवार आहे.नाशिकच्या जनस्थान परिवाराचे ते सक्रिय सदस्य होते.
सोमवारी पहाटे त्यांना अस्वथ वाटत असल्याने त्यांना नाशिक येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्याने त्यांना ब्रेन स्ट्रोक आला त्यातून ते सावरत असतांनाच आज दुपारी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली .आज (२० मे ) सायंकाळी ७ वाजता नाशिकच्या अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या अकाली निधनाने कला क्षेत्रात दुःखाचे सावट पसरले आहे.