नाशिक,दि,२३ ऑक्टोबर २०२४ – गतवेळीही भाजपा कडून उमेदवारी मागून हि न मिळालेले नाराज झालेले भाजपाचे इच्छुक उमेदवार माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी भाजपाला सोडचिट्ठी देण्याचा निर्णय घेतला असून नाशिक पश्चिममधून महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून निवडणूक लढवणार आहेत.आज सायंकाळी ७:३० वाजता ते मनसे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत मनसे मध्ये प्रवेश करणार असून नाशिक पश्चिममधून दिनकर पाटील हे मनसे चे उमेदवार होऊ शकतात.
भारतीय जनता पार्टी ने नाशिक पश्चिममधून उमेदवारी न मिळाल्यामुळे बंडाचा झेंडा फडकवणारे महापालिका माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी मनसेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक पश्चिममधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अजून उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे नाशिक पश्चिममधून दिनकर पाटील हे मनसे चे उमेदवार होऊ शकतात. दिनकर पाटील हे आज मनसे मध्ये प्रवेश करणार आहेत. त्यासाठी ते कार्यकर्त्यांसह मुंबईला रवाना झाले आहेत.
‘जनस्थान शी बोलतांना दिनकर पाटील म्हणले मी गेली अनेक वर्षे भारतीय जनता पक्षाचे काम निष्ठेने करीत आहे. गतवेळीही मी उमेदवारी मागितली; पण मला तेव्हा पुढच्या वेळेचे आश्वासन देत थांबण्याचे सांगण्यात आले. मात्र, आताही डावलण्यात आले., आता थांबायचे नाही, लढायचे’ असा कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याने मी त्यापुढे जाऊ शकणार नाही, असे सांगत भारतीय जनता पक्षाचे नेते दिनकर पाटील यांनी नाशिक पश्चिममधून निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले.
भाजपच्या पहिल्या यादीत नाशिक पश्चिम मतदारसंघातून आमदार सीमा हिरे यांना उमेदवारी जाहीर केल्याने इच्छुक असलेले दिनकर पाटील यांनी आज शिवाजीनगर येथे निर्धार मेळावा घेतला. त्या वेळी कार्यकर्त्यांनी त्यांना निवडणूक लढविण्याचे आवाहन केले.
शिवाजीनगर येथील एल. डी. पाटील शाळेच्या प्रांगणात हा मेळावा झाला. व्यासपीठावर माजी नगरसेविका वर्षा भालेराव, माजी नगरसेवक रवींद्र धिवरे, ज्येष्ठ नागरिक संघाचे जितेंद्र येवले, रूपसिंग पवार, किशोर घाटे, फारूक पठाण, काकडे महाराज आदी उपस्थित होते. काकडे महाराज, यशवंत बोरसे, विठ्ठल अहिरे, घाटे, पठाण, नीलेश भंदुरे यांनी मनोगत व्यक्त केले.
सर्वानी दिनकर पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, असा आग्रह केला.’आम्ही दिनकर पाटील यांच्यापाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळवून देऊ,’जमलेल्या नागरीकांनी सांगितले.