नाशिक – कझाकीस्तान येथे झालेल्या आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धेत नाशिक येथील विजेत्या २० स्पर्धकांचा महाराष्ट्र ट्रायथलॉन असोसिएशन व नाशिक जिल्हा ट्रायथलॉन असोसिएशन यांच्या वतीने नाशिक मुंबई नाका येथील सुप्रसिद्ध मकालू हॉटेल या ठिकाणी भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी नाशिकचे पोलीस उपआयुक्त संजय बारकुंड,माजी आमदार नितीन भोसले, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे,अधीक्षक अभियंता मा. इंजी.यु.बि.पवार,माजी पो.उप आयुक्त नवलनाथ तांबे,क्रीडा अधिकारी महेश पाटील जलतरण तलाव व्यवस्थापाक काटे,कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र ट्रायथलॉन संघटने चे सचिव राजेंद्र निंबाळते,मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे,अशोक तांबे,भाऊसाहेब पाटील, दिलीप हिंगमिरे,अशोक विभांडीक,रोहन भोसले,ताराचंद बांते नाशिक जिल्हा सायकल असोसिएशनचे सचिव नितीन नागरे,विजय देशमुख, हिरेन बुझरुक, Bjp क्रीडा सेल अध्यक्ष राकेश पाटील सर योगा प्रशिक्षक नंदू देसाई,राजेंद्र भावसार, अशोक वनारा,धनंजय कमोदकर, राजेश देशपांडे,नंदू केशलानी,अँड.दिलीप राठी यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रास्ताविकातून राजेंद्र निंबाळते यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगत नवनवीन खेळाडूंना दिशा मिळावी मार्गदर्शन मिळावे यातून नवे खेळाडू घडावेत असे सांगत आयर्न मॅन स्पर्धेतील विविध अडचणी मान्यवरांसमोर मांडल्या.विजेते स्पर्धक नीता नारंग,डॉ.सुभाष पवार पालक अनिल उगले यांनी आयर्नमॅन स्पर्धेतील आपल्या आठवणींना मनोगतातुन उजाळा दिला.यावेळी बोलताना माजी आमदार नितीन भोसले म्हणाले की नाशिक सारख्या महानगर असलेल्या शहरात सुद्धा आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या सायकलिंगसाठी स्पर्धकांना सराव करण्यासाठी जागा नसल्याने जीव मुठीत घेऊन महामार्गावर सराव करावा लागतो.समृद्धी महामार्गावर स्वतंत्र सायकलिंग ट्रॅकसाठी शासन दरबारी एकत्रितपणे लढा देणे गरजेचे असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस उपआयुक्त संजय बारकुंड यांनी ध्येय चिकाटी जोरावरच खेळाडू यशस्वी होत असतात,त्या परिस्थितीत आपण पुढे जाणे गरजेचे असल्याचे सांगितले आगामी काळात जिल्हात होणाऱ्या विविध क्रिडा स्पर्धांना पोलीस खात्यातर्फे सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी निनाद निंबाळते, श्रीराम सांगळे,आशिष निंबाळते,नवनाथ काळे यांनी परिश्रम घेतले.
कझाकीस्तान येथे झालेल्या आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांनी ३.९ किमी स्विमिंग,१८० किलोमीटर सायकलिंग,४२ किमी रनिंग या तिन्ही प्रकारात स्पर्धा विक्रमी वेळेत पूर्ण करणारे नाशीक येथील निलेश झवर,डॉ.वैभव पाटील,डॉ.पंकज भदाणे,डॉ.दुष्यंत चोरडिया,डॉ.अरुण गचाले,किशोर काळे माणिक निकम,अनिकेत झवर,प्रशांत डाबरी, अश्विनी देवरे,नीता नारंग,अविष्कार गचाले,निसर्ग भामरे,अरुण पालवे,महेंद्र चोरडिया,किशोर घुमरे, विजय काकड,धीरज पवार,शिवाजीराव नलाभे,दीपक भोसले यांना मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह शाल बुके व मिठाई देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच गुजरात येते होणाऱ्या नॅशनल गेम्स स्पर्धेत साठी निवड झालेले अनुज उगले, अनुजा उगले व रणवीर भोसले हा उच्च शिक्षणासाठी इंग्लड येथे जात असल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. क्रीडा क्षेत्रात योगदान देणाऱ्या, निंबाळते परिवारातील राजेंद्र निंबाळते,कल्पना निंबाळते,निनाद निंबाळते,इंजी.आशिष निंबाळते, इंजी.प्राची निंबाळते यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.