नाशिक दि. २१ ,डिसेंबर २०२२- हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी दि.२१ डिसेंबर१९०९ रोजी ब्रिटीश कलेक्टर जॅक्सन याची नाशिकच्या विजयानंद थिएटरला गोळ्या घालून हत्या केली ते पिस्तुल नाशिककरांना आज २२ डिसेंबर २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत दुपारी ३ ते रात्री ८ या वेळात नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयात बघता येणार आहे.
हा दुर्मिळ ठेवा सार्वजनिक वाचनालयाच्या वस्तू संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आलेले आहे.हे पिस्तुल बघण्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा.असे आवाहन सार्वजनिक
वाचनालयाच्या कार्यकारी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.