नाशिकच्या माया सोनवणेची महिला IPL,T -20 साठी निवड : स्पर्धेत १२ आंतरराष्ट्रीय खेळाडू

महिला चॅलेंजर्सचे वेळापत्रक : तीन संघ कोणते जाणून घेऊया

0

नाशिक – नाशिक क्रिकेट साठी आनंदाची बातमी. नाशिकची महिला क्रिकेटपटू माया सोनवणेची महिला टी-२० चॅलेंज २०२२ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सदर टी-२० चॅलेंज स्पर्धेचे सर्व सामने २३ ते २८ मे या कालावधीत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे, पुणे येथील स्टेडियम वर होणार आहेत. महिला टी-२० चॅलेंज २०२२ या स्पर्धेत दक्षिण अफ्रीका, इंग्लंड, वेस्ट इंडीज , ऑस्ट्रेलिया तसेच भारतातील दिग्गज महिला क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे आयोजित लालभाई स्टेडीयम, सूरत येथे नुकत्याच पार पडलेल्या वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत अंतिम सामन्यात नाशिकच्या माया सोनवणे ने रेल्वे विरुद्ध २ बळी घेतले . याआधी पुदुचेरी येथे झालेल्या साखळी सामन्यात देखील प्रभावी कामगिरी करताना माया सोनवणे  ने आंध्र व केरळ विरुद्ध ४/४ बळी घेतले होते. अशा प्रकारे आपल्या प्रभावी लेग स्पिन गोलंदाजीने मायाने या वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी स्पर्धेत एकूण ११ बळी घेत आपली छाप उमटविली. २०१४-१५ तसेच २०१७-१८ च्या हंगामात २३ वर्षाखालील महिलांच्या स्पर्धेमध्ये मायाने भारतामध्ये सर्वाधिक १५ गडी बात करण्याचा पराक्रम केला होता. पुदुचेरी येथे झालेल्या २३ वर्षाखालील टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत २०१८-१९ मध्ये  महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना तिने चांगली कामगिरी केली होती. तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय – तर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी – एन सी ए – च्या राष्ट्रीय पातळीवरील शिबिरासाठी देखील निवड झाली . ह्या सगळ्या लक्षणीय, सातत्यपूर्ण कामगिरी च्या जोरावर मायाची महिला टी-२० चॅलेंज २०२२ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

मुळची सिन्नरची असलेली माया सोनवणे , सिन्नरचे सुनील कानडी ह्यांच्यामुळे क्रिकेट कडे वळली . अगदी सुरुवातीपासूनच नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे ज्येष्ठ प्रशिक्षक कै. अविनाश आघारकर ह्यांचे बहुमोल  मार्गदर्शन लाभले . तसेच नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे प्रशिक्षक शिवाजी जाधव, सिन्नर ह्यांचे ही  वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. घरच्या अतिशय साधारण परिस्थितितुन मायाने नाशिकला,  क्रिकेट च्या वेडा मुळे न कंटाळता ये जा करीत प्रचंड  जिद्दीच्या बळावर इथपर्यंत मजल मारली आहे. वयाच्या केवळ ११ व्या वर्षी च मायाची महाराष्ट्र संघासाठी निवड झाली होती. दुखापतीमुळे दुर्दैवाने मायाचे दोन हंगाम वाया गेले. एक अतिशय भरवशाची अष्टपैलु खेळाडू होण्याचे तिचे स्वप्न आहे. योगायोगाने पुर्वी कधीही न बघितलेल्या द . आफ्रिकेच्या कंबरेत अतिशय वाकुन खास शैलीत गोलंदाजी करणार्‍या पॉल अॅडम्स प्रमाणेच माया उजव्या हाताने सुरेख लेग स्पिन टाकते.तसेच सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन मोक्याच्या वेळी संघाला मदत करीत असते.

महिला टी-२० चॅलेंज २०२२ , या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी माया सोनवणेच्या या  निवडीबद्दल  नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खास अभिनंदन करून स्पर्धेतील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

महिला टी-20 लीगचे सर्व सामने पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळवले जातील. स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांना तीन वेगवेगळ्या संघांचे कर्णधारपद देण्यात आले आहे. तर आयपीएलने जारी केलेल्या मीडिया अ‍ॅडव्हायझरीनुसार या स्पर्धेत भारताच्या सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूंशिवाय दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला खेळाडूही या लीगचा भाग असतील. यंदाच्या महिला टी-20 चॅलेंजमध्ये एकूण 12 आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार आहेत.

महिला चॅलेंजर्सचे वेळापत्रक
पहिला सामना : ट्रेलब्लेझर्स वि सुपरनोव्हास, 23 मे 2022, संध्याकाळी 7:30 PM
दुसरा सामना : सुपरनोव्हा विरुद्ध वेग, 24 मे 2022, दुपारी 3:3 PM
तिसरा सामना : वेग विरुद्ध ट्रेलब्लेझर्स, 26 मे, 26 मे 2022, PM 7:30
फायनल : 28 मे संध्याकाळी 7:30 वाजता

तीन संघ पुढीलप्रमाणे आहेत
सुपरनोवा: हरमनप्रीत कौर (कर्णधार), तानिया भाटिया, एलेना किंग, आयुष सोनी, चंदू वी, डिआंड्रा डॉटिन, हरलीन देओल, मेघना सिंग, मोनिका पटेल, मुस्कान मलिक, पूजा वस्त्राकर, प्रिया पुनिया, राशी कनोजिया , सोफी एक्लेस्टोन, सुने लुस आणि मानसी जोशी.

ट्रेलब्लेझर्स: स्मृती मानधना (कर्णधार), पूनम यादव, अरुंधती रेड्डी, हेली मॅथ्यूज, जेमिमा रॉड्रिग्स, प्रियंका प्रियदर्शिनी, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग, रिचा घोष, एस मेघना, सायका इशाक, सलमा खातून, शर्मीन मलिक, शर्मीन अख्तर, शर्मीन अख्तर एस.बी.पोखरकर.

वेग : दीप्ती शर्मा (कर्णधार), स्नेह राणा, शेफाली वर्मा, अयाबोंगा खाका, केपी नवगिरे, कॅथरीन क्रॉस, कीर्ती जेम्स, लॉरा वोलवॉर्ट, माया सोनवणे, नथकेन चेंटम, राधा यादव, आरती केदार, शिवली शिंदे, सिमरन बहादूर, यस्तिका भाऊ आणि प्रणवी चंद्रा.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.