नाशिकचा पारा घसरला : नाशिक ६.६ तर निफाडला ५.५ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद

0

नाशिक – यंदाच्या हंगामातील नाशिक मध्ये आज नीचांकी तापमान झाले असून नाशिकमध्ये पारा (Nashik temperature)  ६.६ वर आला असून निफाड मध्ये आज सकाळचे तापमान ५.५ नोंदवण्यात आले आहे.काल सकाळी नाशिक मध्ये १४.८ अंश डिग्री सेल्सिअस तापमान होते. परंतु आज सकाळी बदलत्या हवामानामुळे हे तापमान थेट ६.६ अंश डिग्री सेल्सिअस एवढे खाली आले आहे. जिल्ह्यात सर्वात कमी तापमान निफाड येथे ५.५ डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले.

पाकिस्तान आणि गुजरात येथून आलेल्या धुळीच्या वादळामुळे तापमानात घसरण झाली आहे. हवामान खात्याने उत्तर महाराष्ट्रात गारपिटीचा अंदाज वर्तवला आहे. दाट धुके आणि बदलते हवामान यामुळे नाशिक जिल्ह्याचे तापमान ८.५ अंशाने घसरले आहे.

दरम्यान नाशिक जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीने नागरीक गारठले असून सकाळपर्यंत शेकोट्या पेटल्याचे चित्र दिसून येत होते. नाशिक आणि निफाड मध्ये यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून पुढील काही दिवस अशीच थंडी राहील असे तज्ज्ञांचे मत आहे.

या तापमानामुळे द्राक्ष उत्पादकांसह गहू, हरभरा, कांदा उत्पादक शेतकर्‍यांमध्येही टेन्शन वाढले आहे.

राज्यात या शहरातील आजचे तापमान
नाशिक -६.६
निफाड -५.५
जळगाव – ९.२
मालेगाव -९.६
बारामती -१२.५
पुणे – १०.४
ठाणे – १९
कुलाबा – १६.२
माथेरान – ७.६

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.